शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

खडसंगी गट ग्रामपंचायतीला महिला सरपंचाची एलर्जी

By admin | Updated: March 27, 2015 00:52 IST

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय तत्कालीन काँग्रेस शासनाने घेतले. त्यामध्ये महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.

राजकुमार चुनारकर खडसंगीपंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय तत्कालीन काँग्रेस शासनाने घेतले. त्यामध्ये महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील अनेक गावांतील ग्रामपंचायतीच्या कारभारी महिला झाल्या आणि पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून त्या कारभार चालवित आहेत. मात्र खडसंगी गट ग्रामपंचायतीच्या इतिहासात आजपर्यंत चार महिला सरपंच झाल्या. त्यापैकी तीन महिला सरपंचावर पद गमविण्याची नामुष्की ओढवली. शासन गावाच्या व देशाच्या विकासात महिलांना पुढे करीत असले तरी मात्र खडसंगी गटग्रामपंचायतीला आदिवासी व दलित महिला सरपंचाची ‘एलर्जी’ का, असा प्रश्न खडसंगी गावातील नागरिकांत चर्चीला जात आहे.चिमूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत म्हणून खडसंगी गावाला ओळखले जाते. तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य संख्या आहे. राजकीयदृष्ट्या संवेदननशिल असले तरी गाव पुर्णत: शांतताप्रिय आहे. राजकारणापुरते एकामेकांमध्ये मतभेद ठेवतात. मात्र काही दिवसांत सर्व विसरून एकमेकांशी मैत्रीने वागतात. अनेक जाती धर्माचे लोक असले तरी खडसंगीत आजपर्यंत कुठलीही समाज विघातक घटना घडली नाही. त्यामुळे गावात सर्वधर्म समभाव रूढ झाला आहे.खडसंगी गट ग्रामपंचायतीमध्ये पुरुषाचेच वर्चस्व होते. मात्र ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांची मक्तेदारी संपवत सरपंच बनण्याचा मान अल्पसंख्याक समाजाच्या जे.एस. कुरेशी यांना मिळाला. त्यांनी पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्णदेखील केला. त्यानंतर मात्र ग्रामपंचायतीच्या राजकारणात उलथापालथ सुरू झाली. आदिवासी महिलेसाठी राखीव पद असल्याने मंजुषा सोयाम यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांना पाच वर्षे सत्ता उपभोगता आली नाही. विरोधी गटाने पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करून त्यांना पदावरून हटविण्यात ते यशस्वी झालेत. त्यामुळे पाच वर्षे पदावर राहण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. सन २००७ मध्ये अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या पदावर नम्रता वासनिक यांची सरपंच निवड करण्यात आली. त्यांच्यावरसुद्धा त्याच्याच गटाच्या राजकारण्यांनी वेगवेगळे राजकीय आयुध वापरून अपात्र ठरविले. मात्र नम्रता वासनिक यांनी संघर्ष करीत न्यायालयात आव्हान देऊन पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.मागील अडीच वर्षाआधी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झालेल्या आदिवासी महिला सुमन कुंभरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ चांगला गेला. मात्र खडसंगीतील राजकारणी पुरुष मंडळीला हे पचनी पडले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा राजकीय आयुधांचा वापर करीत सुमन कुंभरे यांच्याविरुद्ध शौचालय असतानाही शौचालय नसल्याची खोटी तक्रार केली. या प्रकरणात अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सुमन कुंभरे यांना अपात्र ठरविले. मात्र महिला सरपंचाने या आदेशाविरूद्ध उपआयुक्त नागपूर यांच्याकडे आव्हान दिल्याने त्यांच्या पदाला काही काळ जीवनदान मिळाले आहे. या प्रकारामुळे तिसऱ्या महिला सरपंचाला न्यायालयात चकरा माराव्या लागणार, हे तेवढेच खरे आहे.खडसंगी ग्रामपंचायतीमध्ये चार महिला सरपंचांपैकी अल्पसंख्याक असलेल्या जे.एम. कुरेशी यांनाच पूर्णकाळ सत्ता भोगता आली. तर आदिवासी महिला मंजुषा सोयाम, अनु. जाती नम्रता वासनिक व विद्यमान सरपंच सुमन अशोक कुंभरे यांनाही अपात्र ठरविले. गेल्या काही वर्षांत खडसंगीत घडलेल्या या प्रकाराने खडसंगी ग्रामपंचायतीला आदिवासी व दलित महिला सरपंचाची एलर्जी तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.