शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गृहपाठ न केल्याने चंद्रपुरात केजी २ च्या विद्यार्थिनीला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 10:36 IST

वर्गात फळ्यावर दिलेले गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षिकेने केजी-२ च्या विद्यार्थिनीला केस पकडून जबर मारहाण केली. ही घटना चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल अकॅडमी स्कूल येथे मंगळवारी घडली.

ठळक मुद्देव्हायरल व्हिडिओने खळबळ चंद्रपुरातील माऊंट कार्मेलच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्गात फळ्यावर दिलेले गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षिकेने केजी-२ च्या विद्यार्थिनीला केस पकडून जबर मारहाण केली. ही घटना चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल अकॅडमी स्कूल येथे मंगळवारी घडली. याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या आईने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे.मुलांना शाळेची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण द्यावे, असा शासनाचा नियम आहे. मात्र, माऊंट कार्मेेल अकॅडमी येथील शिक्षिका मल्लिका सरकार यांनी केजी-२ मधील तीन ते चार वर्र्षांच्या एका मुलीला वर्गात फळ्यावर दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून वर्गातच केस पकडून जबर मारहाण केली. शिवाय, डोक्यावरील केस उपटले. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी गेली. आईचे लक्ष मुलीच्या केसांकडे गेले. विचारपूस केली असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला सदर प्रकरणाची माहिती दिली. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला बोलावून प्रकरणाची चौकशी केली असता मारहाण केली नाही, असा दावा तिने केला. त्यामुळे पालकांनी शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज दाखविण्याची मागणी केली. फुटेज बघितले असता, आई-वडील थक्कच झाले. गृहपाठ पूर्ण न केल्याच्या छोट्याशा कारणामुळे मुलीला समजाविण्याचे सोडून केस उपटण्यापर्यंत मारहाण करणे, शासनाच्या नियमाविरुद्ध आहे. त्यामुळे पीडित मुलीची आई मीनाक्षी नितीन सरकार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी शिक्षिका मल्लिका सरकार हिच्यावर कलम ३२३ नुसार अदखल पात्र गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, विद्यार्थिनीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पालक वर्गाकडून शिक्षिकेविषयी रोष व्यक्त केला जात आहे. त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे.मुलांना शाळेची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण द्यावे, असा शासनाचा नियम आहे. मात्र, माऊंट कार्मेेल अकॅडमी येथील शिक्षिका मल्लिका सरकार यांनी केजी-२ मधील तीन ते चार वर्र्षांच्या एका मुलीला वर्गात फळ्यावर दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून वर्गातच केस पकडून जबर मारहाण केली. शिवाय, डोक्यावरील केस उपटले. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी गेली. आईचे लक्ष मुलीच्या केसांकडे गेले. विचारपूस केली असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला सदर प्रकरणाची माहिती दिली. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला बोलावून प्रकरणाची चौकशी केली असता मारहाण केली नाही, असा दावा तिने केला. त्यामुळे पालकांनी शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज दाखविण्याची मागणी केली. फुटेज बघितले असता, आई-वडील थक्कच झाले. गृहपाठ पूर्ण न केल्याच्या छोट्याशा कारणामुळे मुलीला समजाविण्याचे सोडून केस उपटण्यापर्यंत मारहाण करणे, शासनाच्या नियमाविरुद्ध आहे. त्यामुळे पीडित मुलीची आई मीनाक्षी नितीन सरकार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिसांनी शिक्षिका मल्लिका सरकार हिच्यावर कलम ३२३ नुसार अदखल पात्र गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, विद्यार्थिनीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पालक वर्गाकडून शिक्षिकेविषयी रोष व्यक्त केला जात आहे.विद्यार्थ्यांना मारहाण करु नये, असे शिक्षिकांना सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थिनीला मारहाण करण्याची घटना घडली. त्यामुळे दोषी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.- सिस्टर नित्या, मुख्याध्यापिका, माऊंट कार्मेल अकॅडमी, चंद्रपूर 

टॅग्स :Studentविद्यार्थी