शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

यशासाठी निरोगी जीवनाची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:08 IST

सुयशासाठी प्रत्येक व्यक्ती व युवक-युवतीने निरोगी जीवनाची कास धरावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयातील बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : सरदार पटेल महाविद्यालयात बॅडमिंटन वुडन कोर्टचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुयशासाठी प्रत्येक व्यक्ती व युवक-युवतीने निरोगी जीवनाची कास धरावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयातील बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी रमेश मामीडवार, तर मंचावर सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, डॉ.कीर्तीवर्धन दीक्षीत, प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, रघुवीर अहीर, तालुका क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक, डॉ. विजय सोमकुंवर प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय खेळाडू धनश्री लेकुरवाळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.ना. अहीर यांनी बॅडमिंटन वुडन कोर्ट खासदार स्थानिक विकास निधी २०१७-१८ अंतर्गत बांधून देऊ, अशी घोषणा केली होती. त्याची पूर्तता पूर्ण करून त्यांनी विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिला. ना. अहीर म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली शारीरिक क्षमता उत्तम ठेवली पाहिजे. आजच्या तरूणाईने वाहने चालवत असताना एकदिवस तरी सायकलचा वापर करावा. यातून उत्तम व्यायाम होईल. अतिशय खडतर परिश्रम करून उत्कृष्ट खेळाडू व्हावे आणि आपल्या देशाचे नाव् उज्ज्वल करावे, असा संदेश ना. अहीर यांनी दिला. रमेश मामीडवार म्हणाले, महाविद्यालयाच्या वतीने वर्षभर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम सुरू आहेत. प्रशांत पोटदुखे यांनीही संस्थेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय केले, याची माहिती सादर केली. राष्ट्रीय, अखिल भारतीय, राज्यस्तरीय, गोंडवाना विद्यापीठातील विजेता संघातील गुणवंत खेळाडूंचा ट्रॅकसूट, खेळाचे शूज व ब्लेझर देऊन सत्कार करण्यात आला. खेळाडू धनश्री लेकुरवाळे यांनाही सन्मानित करण्यात आले.वुडनकोर्ट खासदार विकास निधीतून बनवून दिल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मामीडवार यांच्या हस्ते ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा.कुलदीप आर.गोंड यांनी केले. आभार डॉ.विजय सोमकुंवर यांनी मानले.