लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात लंपी आजाराने तोंड वर काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अगदी हंगामाच्या दिवसामध्ये जनावरे आजारी होत असल्यामुळे पशुचिकित्सकाकडे उपचारासाठी नेत आहे. मात्र अनेक ठिकाणी लस उपलब्धच नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन आले असून ते स्वखर्चाने लस उपलब्ध करून देत आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागानेही नियोजन केले असून गावागावंत शिबिर आयोजित केले आहे.आजार टाळण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवावा, पाणी साचू नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. गाई व म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. या विषाणूचे शेळ्या मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले. हा आजार शेळ्या, मेंढ्यांना नाही.गोठ्यात औषधांची फवारणी करावीनिरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी बाधित जनावरे वेगळी बांधावीत. प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांवर तसेच गोठ्यात डास, माश्या, गोचीड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी यासाठीच्या आवश्यक औषधांची फवारणी करावी. देशी वंशाच्या जनावरांपेक्षा सकरीत जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.आजाराची लक्षणेहा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.सुरूवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारिक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय आदी भागात येतात.बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरांना चालताना त्रास होतो.
गोठा स्वच्छ ठेवा, आजार टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST
आजार टाळण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवावा, पाणी साचू नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. गाई व म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. या विषाणूचे शेळ्या मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले. हा आजार शेळ्या, मेंढ्यांना नाही.
गोठा स्वच्छ ठेवा, आजार टाळा
ठळक मुद्देलंपी आजाराने जिल्ह्यात काढले तोंड वर : हंगामाच्या दिवसातच शेतकऱ्यांची चिंता वाढली