शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरीतील कपिलची आत्महत्या नसून घातपातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

ज्या दिवशी त्याचा मृतदेह गोंडपिपरीतील कार्यालयात आढळला, तेव्हा घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती. त्याच वेळी चेकदरूर येथील एक तरुणी वराते कुटुंबीयांना घटनेची माहिती न देता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. घटनेनंतर प्रत्येक सोपस्कारात ती पुढाकार घेत होती. यामुळे वराते कुटुंबीयांनी तिच्यावर संशय व्यक्त केला आहे. घटनेला आठ दिवस लोटले. मात्र पोलिसांनी अद्यापही कुटुंबीयांचा जबाब नोंदविला नाही.  

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : गोंडपिपरी शहरातील महिंद्रा होम फायनान्समध्ये रोखपाल या पदावर कार्यरत कपिल वराते या तरुणाचा कार्यालयातच गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कपिलने आत्महत्या केली नसून, त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेतून केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची त्यांनी मागणी केली.३ एप्रिल रोजी गोंडपिपरीस्थित महिंद्रा होम फायनान्सच्या कार्यालयात रोखपाल कपिल वराते या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता. दरम्यान, कपिलने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. कपिल हा चेकदरूर येथील रहिवासी होता. ज्या दिवशी त्याचा मृतदेह गोंडपिपरीतील कार्यालयात आढळला, तेव्हा घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती. त्याच वेळी चेकदरूर येथील एक तरुणी वराते कुटुंबीयांना घटनेची माहिती न देता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. घटनेनंतर प्रत्येक सोपस्कारात ती पुढाकार घेत होती. यामुळे वराते कुटुंबीयांनी तिच्यावर संशय व्यक्त केला आहे. घटनेला आठ दिवस लोटले. मात्र पोलिसांनी अद्यापही कुटुंबीयांचा जबाब नोंदविला नाही.  या प्रकरणाची कुठलीच चौकशी केली नाही. दरम्यान ती तरुणी गावात नसल्याने कुटुंबीयांचा संशय अधिक बळावला आहे.  कपिलने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाला आहे, असा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; जेणेकरून सत्य समोर येईल, अशी मागणी कपिलची आई कुसुम वराते व भाऊ देविदास वराते यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कुटुंबीयांनी उपस्थित केल्या या शंकाया घटनेबाबत कुटुंबीयांनी आता विविध शंका उपस्थित केल्या आहेत. कपिलचे पुढच्या महिन्यात लग्न होते. तो कुठल्याच आर्थिक विवंचनेत नव्हता. आपल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर पोलीस व महिंद्रा होम फायनान्सच्या कार्यालयाकडून आम्हाला कुठलीच माहिती देण्यात आली नाही. घटनेनंतर खूप उशिराने कपिलचा अपघात झाला. ही माहिती गावातून मिळाल्याने आम्ही गोंडपिपरीला पोहोचलो. मात्र तिथे गेल्यानंतर कार्यालयातच कपिलचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह असल्याचे समजले. घटनास्थळी कार्यालयाचे शटर बंद करून पोलीस चौकशी करीत होते आणि आम्हाला बाहेर थांबविण्यात आले. चौकशीअंती कार्यालयाचे शटर उघडण्यात आले, तेव्हा मृतदेह बघण्यासाठी आम्ही गेलो. यावेळी कपिल ज्या अवस्थेत होता, ती अवस्था बघून त्याने आत्महत्या केली असे वाटत नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी