शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

चंद्रपूर जिल्ह्यातील कुनाडा कोळसा उत्पादन सहा महिने ठप्प राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:35 IST

माजरी वेकोलि क्षेत्रातील कुनाडा कोळसा खाणीत विस्तीर्ण मातीचा ढिगारा कोसळून १ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे वेकोलिला जबर फटका बसला आहे. परिणामी कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत या खाणीतून कोळसा उत्पादन करणे आता वेकोलिसाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देवेकोलिला जबर फटकाधनसार कंपनी काळ्या यादीत जाण्याची शक्यता

राजेश भोजेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : माजरी वेकोलि क्षेत्रातील कुनाडा कोळसा खाणीत विस्तीर्ण मातीचा ढिगारा कोसळून १ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे वेकोलिला जबर फटका बसला आहे. परिणामी कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत या खाणीतून कोळसा उत्पादन करणे आता वेकोलिसाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे.वेकोलिच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून अपघाताची चौकशी सुरू आहे. धनसार इंजिनिअरींग प्रायव्हेट कंपनीने नियमबाह्यपणे कोळसा उत्पादन केल्याचे सुरूवातीपासूनच वेकोलि अधिकारी सांगत आहे. यावर आता विशेष चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. या अहवालाच्या आधारे आरोप निश्चित करून सदर कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शक्यताही वेकोलिच्या सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली.कुनाडा कोळसा खाणीत अपघात झाल्यापासून १५ दिवसांपर्यंत काम बंद ठेवण्यात आले आहे. अपघाताची भीषणता विचारात घेता पुढील सहा महिन्यांपर्यंत या कोळसा खाणीतून कोळश्याचे उत्पादन सुरू करणे शक्य नसल्याची माहितीही सूत्राने दिली. सेंट्रल माईन प्लॅनिंग अ‍ॅन्ड डिझाईन आॅथोरेटी आॅफ इंडियाकडून (सीएमपीडीआय) रितसर मंजुरी घेऊन त्यांनी आखून दिलेल्या गाईडलाईनप्रमाणेच काम करावे लागते. मात्र धनसार कंपनीने कोळसा उत्पादनाच्या हव्यासापोटी हे सर्व मापदंड बाजुला ठेवल्याची बाब चौकशीत पुढे असल्याचेही समजते.वेकोलि अधिकाऱ्यांनाही होती तडा गेल्याची माहितीमातीच्या ढिगाऱ्याच्या चारही बेंचला तडा गेल्याची माहिती कामगारांनी धनसार कंपनीसह वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेली होती. परंतु उत्पादन ठप्प होऊ नये म्हणून कामगारांचा जीव धोक्यात घालून कोळशा उत्खनन सुरू ठेवले होते. वेकोलि अधिकारीही काहीच माहिती नसल्याचे भासवत होते, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. घटनेनंतर येथे भेटी देणाऱ्या वरिष्ठ अधिकारी व राजकीय मंडळींपासूनही ही माहिती दडवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.कामगारांना गप्प राहण्याची धमकीया घटनेनंतर वकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्या आहे. घटनेमागील सत्यता पुढे येऊ नये, यासाठी कंत्राटदार कंपनीकडून पूर्णत: काळजी घेतली जात आहे. कामगारांना याबाबत काही बाहेरची मंडळी धमकावत असल्याची कुजबुज सुरू आहे.ही घटना भीषण होती. याचा जबर फटका वेकोलिला बसला आहे. ज्या कंपनीला कोळसा उत्पादनाचे कंत्राट दिले होते. त्या कंपनीने सीएमपीडीआयच्या मापदंडानुसार काम केले वा नाही याची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेपासून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. चौकशी अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.- हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार.

टॅग्स :Accidentअपघात