शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

स्थानिकांचा विरोध झुगारून कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याचा डाव

By admin | Updated: March 25, 2017 00:47 IST

कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याच्या शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे.

४८ गावातील नागरिक रोजगारमुक्त : जनतेच्या रोजगारापेक्षा वाघांच्या संरक्षणावर भरसुरेश रंगारी कोठारीकन्हारगाव अभयारण्य घोषित करण्याच्या शासनस्तरावरुन हालचालींना वेग आला असून लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक आदिवासी गोरगरीब कुटूंबावार उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण होणार असल्याने या अभयारण्यास स्थानिकांनी कडवा विरोध दर्शविला आहे.मागील दोन वर्षापासून कन्हारगाव अभयारण्य करण्यासाठी वन्यजीव संघटना शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. ही बाब स्थानिक जनतेला समजली तेव्हापासून या प्रस्तावाला विरोध सुरू झाला. त्यासाठी गावकऱ्यांनी मोर्चे, आंदोलन व धरणे दिले. स्थानिक क्षेत्राचे खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार सुभाष धोटे, आ. नाना श्यामकुळे, आ. शोभाताई फडणवीस, माजी आ. सुदर्शन निमकर यांनी कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यात येवू नये, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला. तसेच गोंडपिपरी, पोंभूर्णा व बल्लारपूर तालुक्यातील ४८ गावाचे सरपंच, उपसरपंच, जि.प. सदस्य, पं.स. सदस्यांनी अभयारण्याला विरोध करण्यासाठी शासनाकडे ग्रा.पं. ठराव आमसभेचा ठराव, निवेदने पाठविली. मात्र शासनाने स्थानिक ग्रा.पं.च्या ठरावाला केराची टोपली दाखून वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यासाठी तत्परता दाखवित आहे.कन्हारगाव क्षेत्र महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे मध्य चांदा प्रभाग बल्हारशाहाच्या ताब्यात आहे. या क्षेत्रासह झरण, तोहोगाव व धाबा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील कामावर गोंडपिपरी, पोंभूर्णा, बल्लारपूरसह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चार ते पाच हजार मजूर धान शेतीनंतर काम करतात. या क्षेत्रातील कामातून आदिवासी व इतरांना सतत आठ महिने रोजगार उपलब्ध होतो. या रोजगारामुळेच कुटूंबाचे उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण, लग्न यासारख्या जटील समस्याचे निराकरण होते. कन्हारगाव अभयारण्यामुळे ४७ गावे बाधित होवून हजारो कुटुंबाच्या रोजगाराची व उदरनिर्वाची समस्या गंभीर होणार आहे. स्थानिकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्रस्त शेतकऱ्यांना या क्षेत्रातील कामे त्याचा मोठा आधार असून तेच हिरावले गेल्यास विविध समस्या उत्पन्न होवून ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ४२ गावांना या अभयारण्याचा फटका बसून गावागावात संसार थाटणाऱ्या गावकऱ्यांना निर्वासिताचे जीवन जगावे लागणार आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे. वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे षडयंत्रसध्या कन्हारगाव वनक्षेत्रात वाघाचे व इतर वन्यप्राण्यांचे संरक्षण व संगोपन उत्तमरित्या अभयारण्य घोषित न करतासुद्धा करीत आहे. या क्षेत्रात आजपर्यंत कोणत्याही शिकारीच्या घटना घडलेल्या नसताना केवळ वन्यजीव सुरक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. रोजगारासाठी करावेलागणार पलायनकन्हारगाव अभयारण्य घोषित होण्याचे स्थानिक गावकऱ्यांना सजले असून त्यांच्यात भिती निर्माण झाली आहे. आता रोजगारासाठी परप्रांतात पलयान करण्याची वेळ आली असून शासन स्थानिकांच्या पोटावर पाय देण्याचे षडयंत्र करीत असल्याचा तीव्र भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.