शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांजीपेठ- बल्लारपूर-पुणे रेल्वेगाडी रखडली

By admin | Updated: May 25, 2015 01:39 IST

कांजीपेठ- बल्लारपूर या मार्गाने पुणेकरिता रेल्वे गाडी सुरु करावी, अशी मागणी या भागातील जनतेची बऱ्याच वर्षांपासून आहे.

बल्लारपूर: कांजीपेठ- बल्लारपूर या मार्गाने पुणेकरिता रेल्वे गाडी सुरु करावी, अशी मागणी या भागातील जनतेची बऱ्याच वर्षांपासून आहे. या भागातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच प्रवाशी मंडळींनी प्रत्येक वेळच्या रेल्वेमंत्री तदवतच संबंधित रेल्वच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिले आहेत. या मागणीत पुणेकरिता या मार्गाने गाडी सुरू करणे कसे आवश्यक आहे, हे मुद्देही अनेकवार संबंधितांपुढे मांडले आहेत, परंतु त्यावर प्रत्येक मंत्र्यांनी या संदर्भात तपास सुरू आहे, असेच उत्तर पाठविले आहे. या प्रकारे जनतेच्या या आवश्यक मागणीकडे आजवर सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ तसेच सीमावर्ती तेलंगणातील आदिलाबाद, करीमनगर, वरंगल या जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे येथे उच्च शिक्षण घेतात. केवळ राज्यातच नव्हे तर देशातील एज्युकेशन हब म्हणून पुण्याची प्रसिद्धी देशभरात आहे. तदवतच, औद्योगिक शहर म्हणून या शहराने आपली ओळख निर्माण केली आहे. या कारणाने, पुण्याला जाण्या-येण्याचे काम वरील सहाही जिल्ह्यातील लोकांना येते. या भागातील विद्यार्थी व इतरांना पुण्याला जाण्याकरिता नागपूर अथवा वर्धा येथे जाऊन तेथून पुण्याकरिता गाडी पकडावी लागते. यात गाडीची वाट बघत राहण्यात वेळ खर्च होतोच, शारिरीक व मानसिक त्रासही होतो. हा त्रास या भागातील विद्यार्थी व जनतेला अनेक वर्षांपासून सोसावा लागत आहे. हा त्रास दूर व्हावा, याकरिता या भागातून म्हणजे कांजीपेठपासून बल्लारपूर, वर्धा या मार्गाने जाणारी पुणे गाडी सुरू केल्यास लोकांची पुण्याला जाण्याला चांगली सोय होईल आणि रेल्वेला तिकीटातून चांगला महसूलही मिळू शकतो. प्रायोगिक तत्वावर निदान अशी साप्ताहिक गाडी सुरू करता येते. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, आंध्रप्रदेशचे माजी खासदार पूनम प्रभाकर (करीमनगर), रमेश राठौड (आदिलाबाद) इत्यादींनी ही मागणी वेळोवेळी उचलून धरली. पण, या संदर्भात याबाबत तपास केला जात आहे, असेच उत्तर संबंधितांकडून लोकप्रतिनिधींना नेहमी दिले जात आहे. दहा पंधरा वर्षापासून हेच सुरू आहे. २००७ ला रेल्वेच्या वरिष्ठांनी या मागणी संदर्भात एक बैठक घेतली होती. त्यात लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रवाशी मंडळाने ही मागणी उचलून धरली. मात्र पुढे त्यात काहीच प्रगती झाली नाही. चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनने या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या संघाने परत एक निवेदन नुकतेच दिले आहे. चंद्रपूर-गडचिरोली हे जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. या भागातील ग्रामीण व शहरी भागाचा या ना त्या कारणाने पुण्याशी संबंध येतो. आदिवासींच्या विकासावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मग, या भागाच्या प्रवाशांच्या सुविधेकरिता आणि अत्यंत आवश्यक असलेल्या कांजीपेठ- बल्लारपूर पुणे गाडी सुरू करावी, या मागणीकडे दुर्लक्ष करुन या भागातील लोकांची उपेक्षा केली जात आहे. ती होऊ नये याकडे प्रवाशी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी या निवेदनातून रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.सुरेश प्रभु हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांना या भागातील लोकांच्या समस्यांची चांगली जाण आहे. त्यामुळे ते मागणीकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी आशा ‘लोकमत’शी बोलताना सुंचूवार यांनी व्यक्त केली. याबाबत या भागातील युवकांना रेल्वेकडून ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)