शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:42 IST

चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना मिळेना पाणी : बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, या पाणी विक्रीचा कुठलाही रेकॉर्ड मनपाकडे सादर केला जात नाही. पावत्याही दिल्या जात नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपाच्याच एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या प्रकाराची पुष्टी लोकमतकडे केली आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात गेली आहे. या नागरिकांना दररोज पाणी पुरविण्याची जबाबदारी उज्वल कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या इरई धरणात बºयापैकी पाणीसाठा आहे. असे असले तरी चंद्रपूरकरांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. शहरातील अनेक वार्डात पाण्यासाठी बोंबा सुरु आहे. बाबुपेठ बंगाली कॅम्प, हिंग्लाज भवानी वार्ड, अष्टभुजा वार्ड, वडगाव, तुकूम तलाव, सुमित्रा नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, पठाणपुरा, रहमननगर, घुटकाळा, संजय नगर, क्रीष्णा नगर वॉर्डात भीषण पाणी टंचाई आहे. नागरिक वणवण भटकत आहेत, नळ कनेक्शन असतानाही पाणी मिळत नाही. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदार पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून बांधकामधारकांना, बांधकाम कंत्राटदारांना पाणी विकत आहे. विशेष म्हणजे, पाणी विकून पैसे घेताना पावतीही दिली जात नसल्याची माहिती आहे. एकूणच हा पाणी विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे आणि कंत्राटदारांना पाणी विकणे, असा गोरखधंदा ऐन टंचाईच्या काळात सुरु आहे.लग्नासाठी ५०० तर इतर कामांसाठी हजार रुपये दरकाही वार्डातील नागरिकांना मनपाकडून नि:शुल्क पाणी दिले जात असले तरी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमासाठी मनपाकडून पैशाने पाण्याचे टँकर पुरविले जातात. त्याच्या रितसर पावत्या देऊन मनपाकडे रेकॉर्ड ठेवला जातो. लग्न सोहठ्यासाठी ५०० तर इतर कार्यक्रमासाठी हजार रुपये मोजावे लागत आहे.जीपीएस यंत्रणा नाहीपाण्याचे टँकर दिवसभर कुठे जातात, कुठे पाणी पुरविले जाते, याबाबतची माहिती असावी म्हणून टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाते. मात्र मनपाच्या सहाही टँकरमध्ये ही यंत्रणा ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली नाही. याबाबत अग्निशमन विभागातील अधिकाºयाला विचारले असता, आम्ही स्वत:च टँकरसोबत असतो. त्यामुळे आमचे या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण असते. म्हणून जीपीएस यंत्रणा बसविली नसल्याचे सांगितले.मनपाकडून दररोज ५० टँकर फेऱ्यामहानगरपालिकेकडे एकूण सहा टँकर आहे. सध्या शहरात तीव्र पाणी टंचाई असल्याने हे सहाही टँकर विविध वार्डात नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहे. जिथे पाण्याची मागणी असेल तिथे टँकर पाठविला जात आहे. दररोज सहा टँकरच्या सुमारे ५० फेºया मारल्या जात आहे. मनापाकडून हे पाणी नि:शुल्क दिले जात आहे.