शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

काजीपेठ-पुणे रेल्वेगाडी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:34 IST

जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याला जाणे सोईचे व्हावे, यासाठी काजीपेठ-बल्हारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांच्या समस्या दूर : हंसराज अहीर यांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याला जाणे सोईचे व्हावे, यासाठी काजीपेठ-बल्हारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला असून त्यामुळे प्रवाशांची समस्या लवकरच दूर होणार आहे.चंद्रपूर स्थानकावर अनेक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यासाठी ना. हंसराज अहीर यांनी प्रयत्न केले होते. मागील काही वर्षांपासून काजीपेठ-बल्लारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांबरोबरच रेल्वे सुविधा संघटना, संघर्ष समिती व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सातत्याने केली होती. त्यामुळे ना. हसराज अहीर यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन काजीपेठ-बल्लारशाह-पुणे रेल्वेसेवेचे महत्त्व पटवून दिले. शिवाय, रेल्वे प्रवाशांना दिवाळीची भेट द्यावी अशी मागणी केली. या मागणीबरोबर ना. अहीर यांनी लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या विविध समस्यांबाबत रेल्वे मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली.केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या दालनात २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या चर्चेत अहवाल व आवश्यक कागदपत्रांची फाईल सादर करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयीन अधिकाºयांना चर्चेदरम्यान दिले आहे.दरम्यान, काजीपेठ- बल्लारशाह- पुणे ही रेल्वेगाडी सुरू करण्यास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी होकार दर्शविला. ही गाडी सुरू झाल्यास आंध्र प्रदेश आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या चर्चेत श्रद्धासेतू एक्स्प्रेस (फैजाबाद ते रामेश्वरम) ला चंद्रपूर रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय तसेच अन्य एक्स्प्रेसबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. तसेच व्यापार आणि उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने पुणे शहराशी दिवसेंदिवस संबंध वाढत आहे. मात्र, पुण्यात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्याने संकटांचा सामना करावा लागत होता. रेल्वेमंत्र्यांनी काजीपेठ- बल्लारशाह- पुणे ही गाडी सुरू होण्यास होकार दर्शविल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.