शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेच्या ‘त्या’ उमेदवारांना न्याय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

सन २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मयादित परीक्षेत मूळ मागणी पदाव्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील २३० व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या ६३६ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर सामावून घेण्याबाबतचा शासन निणर्य देण्यात आला होता.

ठळक मुद्देपोलीस बाईज असोसिएशन : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित स्पर्धा परीक्षेच्या २०१६ मधील ६३६ उमेदवारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी पोलीस बॉइज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.सन २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मयादित परीक्षेत मूळ मागणी पदाव्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील २३० व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या ६३६ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर सामावून घेण्याबाबतचा शासन निणर्य देण्यात आला होता. सदर शासन निर्णयावरून पोलीस महासंचालक यांनी सदर ६३६ उमेदवारांना प्रशिक्षणकामी पाठविणे असल्याने त्यांचे वैद्यकीय तपासणी करण्याबाबत तसेच उमेदवारांकडून साक्षांकन नमुने सादर करण्याबाबत घटक प्रमुखांना आदेशित केले होते. यावरून सर्व उमेदवारांचे साक्षांकन नमुने सादर करण्यात आलेले आहे. तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल हासुद्धा कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे. उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होऊन जवळपास ८ महिने कालावधी झालेला आहे.परंतु, अजूनपर्यंत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले नाही. तसेच पोलीस उपनिरीक्षक ६३६ उमेदवारांवर हा एक प्रकारचा अन्याय होत आहे. तरी गृहमंत्री यांनी लक्ष देऊन त्या उमेदवारांना न्याय द्यावा व त्यांना तत्काळ प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.उमेदवारांनी अत्यंत मेहनत घेत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यासाठी त्यांनी दिवसरात्र अभ्यास करुन यशप्राप्त केली आहे. मात्र आठ महिन्यांपासून त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नसल्याने अडचण जात आहे.निवेदन देताना पोलीस बॉइज असोसिएशनचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, कार्यकारी अध्यक्ष तोजितचंद्र पिपरे, जिल्हा संघटक सदाम अन्सारी, शहर अध्यक्ष विवेक आत्राम, शहर संघटक साहील मडावी, शहर उपाध्यक्ष देविदास बोबडे, सहसचिव अमित वाघमारे, मार्गदर्शक सल्लागार गजू चंचुवार, विधी सल्लागार आशीष नगराळे व सोहल शेख, सोनू शेख, संतोष कांबळे, पीयूष डोंगरे, विक्की डोंगरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिस