शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:41 IST

लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अडकून पडलेले तब्बल १२०० मजूर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विशेष रेल्वे गाडीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचले.

ठळक मुद्दे१२१२ मजूर आंध्रातून विशेष रेल्वे गाडीने परतले स्वगृही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अडकून पडलेले तब्बल १२०० मजूर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विशेष रेल्वे गाडीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांना घराची ओढ लागली होती. रेल्वेगाडीतून उतरून बाहेर पडताच लगबगीने प्रत्येकजण आपली बस शोधत होते. एकदाचे आपल्या जिल्ह्यात पाय ठेवल्याचा आनंदही या मजुरांच्या चेहऱ्यावर दिसत होता. काही मजुर आपल्या मुलाबाळांसह या लॉकडाऊनमध्ये अडकले होते. हे सर्व मजूर आपल्या गावाला सुखरुप पोहचले आहे.या सर्व मजुरांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हाताच्या मनगटावर शिक्के मारण्यात आले. त्यांचे सॅनिटायझरने हात स्वच्छ करून भोजनाचे पॉकेट दिले गेले. यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करून दिलेल्या २५ बसेसच्या माध्यमातून त्यांना तालुकास्थळी व तेथून स्वगृही पोहचवून देण्यात आले. या सर्व मजुरांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. यावर प्रशासनाची देखरेख असेल. रेल्वे स्थानकावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.लॉकडाऊनमुळे या मजुरांना आंध्र प्रदेशात अडकून राहावे लागले. हाताला काम नाही आणि जवळ रुपयाही नाही, अशा बिकट परिस्थितीचा सामना या मजुरांना गेले दीड महिन्यापासून करावा लागला. त्यांना स्वगृही आणण्यासाठी विशेष गाडीची सुविधा करण्यात आली होती. या गाडीने आलेल्या मजुरांनी आपल्या जिल्ह्यात पाय ठेवताच पोहचल्याचा आनंद त्यांच्या चेहºयावर होता. सोबतच आपल्या घराची ओढही त्यांच्या चेहºयावर स्पष्ट जाणवत होती. मजुरांना घेऊन रेल्वेगाडी चंद्रपूर स्थानकावर आली त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, उपायुक्त विशाल वाघ, तहसीलदार सामान्य संजय राईंनचवार, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार, डॉ. वनिता गर्गेलवार, समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, स्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्ती, तसेच राज्य व रेल्वे पोलीस अधिकारी तर जिल्हा आरोग्य विभागाचे, महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस