जिवती : राज्य कर्मचाऱ्यांसाठी सहावे वेतन आयोग लागून संपण्याच्या तयारीत आहे. तर सातवे वेतन लागण्याची हवा सुरू आहे. असे असले तरी जिवती पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतनाची वाढीव रक्कम अजूनही मिळालेली नाही. यातील काही कर्मचारी इतर पंचायत समितीला बदलूनही गेले. पण पंचायत समितीच्या अजब कारभाराने लाभार्थी कर्मचाऱ्यांना वैतागुण सोडले आहे.जिवती पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून एल.ने. खंंडाळे व सावन चालखुरे तसेच केंद्रप्रमुख म्हणून एस.बी. चंदनखेडे, प्रमोद कोरडे, अविनाश वाकडे, प्रेमकुमार चकिनाला कार्यरत होते. यापैकी एस.बी. चंदनखेडे वगळता सर्वांच्या दोन वर्षा अगोदर बदल्याही झाल्या. पण जिवती पंचायत समितीने या सर्वांचे सहाव्या वेतनाचे एकही हप्ते भविष्य निर्वाह निधीत जमा झाले नाही. जिल्ह्यात इतर सर्वच पंचायत समितीने सहाव्या वेतनाचे सर्वच हप्ते जमा केले असताना जिवती पंंचायत समितीने आतापर्यंत एकही हप्ता जमा का केले नाही, हा एक प्रश्नच आहे.यासंदर्भात सदर कर्मचाऱ्यांनी जिवती पंचायत समितीला दोनदा विचारणा केली असता, कारवाई शुन्य दिसत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. सहावे वेतन आयोग लागु झाल्यापासन व सदर लाभार्थी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यापासून जिवती पंचायत समितीला अनेक संवर्ग विकास अधिकारी आलेत. मग त्यांच्याकडून कारवाई का झाली नाही, शिक्षण विभागातील बाबु लोकांकडून दुर्लक्ष होत आहे का, तर कदाचित कार्यालयातील बाबुंवर संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे वचक नसावे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. एकंदरीत पंचायत समितीच्या अजब कारभार याठिकाणी पाहायला मिळत असून कर्मचारी सहाव्या वेतन आयोगापासून वंचित आहेत. (शहर प्रतिनिधी)
जिवती पंचायत समितीचे कर्मचारी सहाव्या वेतन आयोगापासून वंचित
By admin | Updated: June 24, 2016 01:35 IST