राजुरा : गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व स्थानिक जनतेला मारक ठरणारा कन्हाळगाव, झरण, धाबा, अभयारण्य व बफरझोन क्षेत्र रद्द करण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागले. यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन करुन कन्हाळगाव झरण-धाबा अभयारण्य कदापिही होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुदर्शन निमकर यांनी गोंडपिपरी तालुक्यातील प्रचारादरम्यान केले.सुदर्शन निमकर यांनी प्रचारार्थ गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, खराडपेठ, तारसा, कुरडीहेटी, भनारहेटी, वढोली, धाबा, सोमनपल्ली, हीवरा, अमरहेटी, सकनूर, वेळगाव, पोडसा, सोनापूरसह गोंडपिपरी शहरात प्रचार रॅली काढण्यात आली.याप्रसंगी मार्गदर्शन करताना सुदर्शन निमकर म्हणाले, गोंडपिपरी तालुक्यातील विविध समस्या सोडविण्याठी आपण कटीबद्ध असून, शेतकरी, शेतमजूर व स्थानिक जनतेला मारक ठरणारा कन्हाळगाव- झरण, धाबा अभयारण्य व बफरझोन क्षेत्र रद्द करण्यासाठी भविष्यात कितीही तिव्र आंदोलन करावे लागले तरी ते मागे हटणार नाही.
झरण अभयारण्य होऊ देणार नाही
By admin | Updated: October 11, 2014 01:33 IST