शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जावईबापूंचा पहिला दसरा पाच हजारांवर; सोन्याचा भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

सोन्याचे दर दररोज कमी जास्त होतात. याची कारणे अनेक असली तरी सधन कुटुंब खरेदीला मागेपुढे पाहत नाही. गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. परिणामी,  सोने व चांदीच्या    दरात मोठी घसरण झाली होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही दर कमी होता. त्यामुळे  अनेकांनी खरेदी केली. दसऱ्याला सोने खरेदीची परंपरा असली तर दर वाढल्याने ग्राहक फिरकतील काय, याची चिंता सराफांना आहे. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचे दर ४९ हजारांवर पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देण्याची परंपरा आहे. जावईबापूंचा यंदा पहिलाच दसरा असेल तर काही कुटुंबांत सासरकडून सोन्याचे पान दिले जाते. मात्र, यंदा सोन्याचे दर प्रति तोळा ४९ हजारांवर पोहोचल्याने खरेदी करताना विचारच करावा लागणार, अशी सराफा बाजारातील स्थिती आहे.दिवाळी तोंडावर असल्याने चंद्रपुरातील सराफा बाजारात ग्राहकांची थोडी गर्दी दिसू लागली आहे. सोन्याचे दर दररोज कमी जास्त होतात. याची कारणे अनेक असली तरी सधन कुटुंब खरेदीला मागेपुढे पाहत नाही. गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. परिणामी,  सोने व चांदीच्या    दरात मोठी घसरण झाली होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही दर कमी होता. त्यामुळे  अनेकांनी खरेदी केली. दसऱ्याला सोने खरेदीची परंपरा असली तर दर वाढल्याने ग्राहक फिरकतील काय, याची चिंता सराफांना आहे. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचे दर ४९ हजारांवर पोहोचले.

चांदीच्या दरातही वाढचंद्रपुरातील सराफा बाजारात मुंबई, सोलापूर, कोल्हापूर व नागपूरातून दागिने येतात. चांदीच्या दरात मागील आठवड्यात स्थिरता होती. दिवाळीच्या तोंडावर त्यामध्ये प्रति तोळा ३०० रूपयांची वाढ झाली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ झाली. याचा परिणाम जिल्ह्यातील सराफा बाजारावर झाला आहे. दिवाळीत हा दर पुन्हा वाढू शकतो.

अशी ओळखा सोन्याची शुद्धता  २४ कॅरेट सोने सर्वाधिक शुद्ध आहे. मात्र, पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही.   साधारणत: २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी होतो. त्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते, असा दावा एका व्यावसायिकाने केला. २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल, तर त्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले जातात. केंद्र सरकारने दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क तयार केले. हॉलमार्क दागिन्यांवर असतात. काही जाचक अटींमुळे व्यावसायिकांनी सरकारविरुद्ध बंद पाळला होता.

चंद्रपुरातील बाजारपेठेवर कोरोनाचे सावटसोन्याच्या दरात वाढ का झाली, याबाबत चंद्रपुरातील सराफा व्यावसायिक नथमल टिबडेवाल यांना विचारले असता म्हणाले, सोन्याच्या दरात चढ-उतार होण्याची विविध कारणे आहेत   जागतिक बाजारातील चलन किमतीत झालेला बदल, महागाई, रिझर्व्ह बँकेमध्ये साठविलेले सोने, व्याजदर, दागिने बाजार, भौगोलिक तणाव, व्यापार युद्ध व इतर अनेक घटकांमुळे सोन्याच्या दरावर परिणाम होतो. कोरोनामुळे चंद्रपुरातील बाजारावरही मोठा फटका बसला आहे.

सराफा व्यवसाय रुळावर येण्याची चिन्हेकोरोनामुळे इतरांप्रमाणे सराफा व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. कोरोना संसर्ग धोकादायक स्थितीत असताना जीव वाचविण्यालाच प्राधान्य देणे सुरू होते. जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळल्यास  बाजारपेठ ठप्प होती. आता स्थिती बदलू लागली. दसरा व दिवाळीसाठी सराफा व्यावसायिकांनी नवीन माल खरेदी करून दुकाने सजविली आहेत. बाजारात थोडी गर्दी दिसत असून अशीच स्थिती राहिल्यास खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Goldसोनं