शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

जय जय श्रीरामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:10 IST

पताके, तोरण व रोषणाईने सजलेले शहरातील प्रमुख रस्ते, त्यावर बॅन्ड पथकाचा ताल, रामाचा गजर करणारी गिते आणि जय श्री रामच्या जयघोषाने रविवारी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण चंद्रपूर नगरी दुमदुमली.

ठळक मुद्देबॅन्डपथकाच्या तालावर निघाली शोभायात्राभक्तीमय वातावरण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : पताके, तोरण व रोषणाईने सजलेले शहरातील प्रमुख रस्ते, त्यावर बॅन्ड पथकाचा ताल, रामाचा गजर करणारी गिते आणि जय श्री रामच्या जयघोषाने रविवारी निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण चंद्रपूर नगरी दुमदुमली. सायंकाळी गांधी चौकातून निघालेल्या या शोभायात्रेतील विविध देखावे पाहण्यासाठी चंद्रपूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा अलोट गर्दी केली होती.राम जन्मोत्सव समिती व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरात राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांच्या उत्साहामुळे शनिवारपासूनच उत्सवाला रंग चढला होता. शनिवारी रात्रीच शहरातील प्रमुख रस्ते तोरण, पताका, स्वागतद्वार व रोषणाईने सजले होते. शहरातील विविध चौक भगव्या तोरणाने नटले होते. दरम्यान, रविवारी सकाळपासूनच महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावर लावण्यात आलेल्या ध्वनीक्षेपकावर रामनामाचा जप करणारी गिते लावण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजतानंतर शहरातील वातावरण अधिक भक्तीमय झाले. दरम्यान, सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास येथील काळाराम मंदिरापासून शोभायात्रेला सुरूवात झाली. रामभक्तांचे लोंढेच्या लोंढे गांधी चौकाकडे शोभायात्रा पाहण्यासाठी जात होते. सायंकाळी ७ वाजता शोभायात्रेला गांधी चौकातून प्रारंभ झाला. यात विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत विविध देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. बँडपथकावर अवघ्या तरूणाईने ठेका धरला होता.या शोभायात्रेत भजन मंडळेही सहभागी झाले होते. यात महिला भजन मंडळाचाही समावेश होता. भाजपा, शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते. रात्री ८ वाजताच्या सुमारास महात्मा गांधी मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.स्वयंसेवकांचा अभावशोभायात्रेच्या मार्गात विविध ठिकाणी महाप्रसाद आणि पाणी पाऊचचे स्टॉल लागले होते. पाऊच आणि कागदी प्लेटामधून पदार्थ खाल्यावर ते रस्त्यावर फेकले जात होते. यापूर्वी चंद्रपुरात गणेश विसर्जन असो की अन्य कुठलीही शोभायात्रा महाप्रसादादरम्यान होणारा कचरा स्वयंसेवकांमार्फत तत्काळ उचलला जात होता. मात्र यावेळी स्वयंसेवकांचा अभाव दिसून आला. अनेक ठिकाणी रस्त्यावर कागदी प्लेटा पडलेल्या दिसून येत होत्या. काही संघटनांनी महाप्रसादाजवळच डस्टबीनची व्यवस्था केली होती.विविध ठिकाणी महाप्रसाद वितरितस्थानिक गांधी चौकातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. ठिकठिकाणी खाद्य पदार्थ, पिण्याची पाणी, फळे, सरबत व महाप्रसाद वाटपाचे स्टॉल लावले होते. शोभायात्रा पाहण्यासाठी आलेले भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेत होते.पालकमंत्र्यांनी केले शोभायात्रेचे स्वागतराज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रविवारी चंद्रपुरात होते. रामनवमीनिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी शोभायात्रेत पायदळ फिरून देखावे बघितले व शोभायात्रेचे स्वागत केले.