शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेती सोडून दिलेलीच बरी, मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत असून, शेतकऱ्यांनादेखील हा फटका अधिकच बसत आहे.  शेतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; मात्र डिझेलचा दर सातत्याने वाढत असल्याने ट्रॅक्टरने शेती करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कापूस तसेच सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळेल; मात्र उत्पादन कमी असल्यामुळे त्यांना फारसा फायदा झालेलाच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढले आहेत. त्यामुळे  यंत्राद्वारे शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. दुसरीकडे मजुरांना दिवसाचे ५०० रुपये देऊन ते शेतात काम करण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. शहरातील आणि सावलीतील काम करण्याकडेच त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे शेती सोडून दिलेलीच बरी, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत असून, शेतकऱ्यांनादेखील हा फटका अधिकच बसत आहे.  शेतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; मात्र डिझेलचा दर सातत्याने वाढत असल्याने ट्रॅक्टरने शेती करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कापूस तसेच सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळेल; मात्र उत्पादन कमी असल्यामुळे त्यांना फारसा फायदा झालेलाच नाही. त्यामुळे नापिकीला शेतकरी कंटाळले आहे. त्यातच सातत्याने वाढणाऱ्या भाववाढीमु‌ळे शेती व्यवसाय करणे सोडून द्यावे, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

वर्षभरात ट्रॅक्टर मशागत दुप्पट- मागील वर्षी शेतकऱ्यांनी एकरी ५०० ते ६०० रुपये नांगरणीसाठी दिले होते. यावर्षी मात्र १००० रुपये एकर नांगरणीचे दर आकारले जात      आहे. 

दिवसाला ५०० रुपये, तरी मजूर मिळेनाn  सध्या स्थितीत दिवसाला ५०० रुपये मजुरी देऊन मजूर मिळत नसल्याची स्थिती ग्रामीण भागात आहे. उन्हात काम नको म्हणत अनेकजण मजूरी टाळत आहे.

शेतकरी म्हणतात...

दिवसेंदिवस शेती करणे कठीण झाले आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. दुसरीकडे टॅक्टर तसेच आधुनिक यंत्रांनी शेती करण्याचा प्रयत्न केला तर डिझेल महाग झाले आहे. त्यामुळे काय करावे, समजत नाही. उत्पादनापेक्षा खर्च अधिक, अशी अवस्था आहे.-संबाशीव जुनघरी

आता नाइलाजाने शेती करावी लागत आहे. उन्हातान्हात काम करून शेती करायची, निसर्गाने साथ दिली तर ठीक, नाही तर पुन्हा कर्जबाजारी होऊन पेरणी करायची. आता तर शेतमजूर मिळत नाही. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरवाल्यांनीही आपले दर वाढविले आहेत. -ज्ञानेश्वर बोबडे

डिझेलचे भाव वाढले, आम्ही काय करणार?

पूर्वी डिझेलचे दर कमी होते. त्यामुळे ट्रॅक्टर तसेच इतर साधनांचे दर कमी होते. आता डिझेलचे दर वाढल्यामुळे पूर्वीसारखे दर देणे परवडत नाही. आम्हाचाही नाइलाच झाला आहे. घडाईपेक्षा मळाई जास्त असल्यासारखी स्थिती आहे.-रूपेश कोटकर

मागील वर्षी डिझेल, पेट्रोलचे दर सातत्याने वाढले आहे. त्यामुळे शेतीकाम तसेच इतर कामाचेही दर वाढविण्यात आले आहे. परवडत नसल्याने हे दर वाढविण्यात आले आहे.-रत्नाकर माकोडे

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती