शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

रेल्वे उड्डाण पुलाचा वाद मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:00 IST

येथील वस्ती आणि डेपो भागाला रहदारीने जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून नगरपरिषदेच्या सहकार्याने केले जात आहे. बरेचसे काम झाले आहे. मात्र, वस्ती भागाकडील पुलाचा उतरणारा भाग कसा असावा, याबाबत पुलाजवळी रहिवासी आणि इतर नागरिक यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. अखेर, यावर दोन्ही बाजुंच्या लोकांशी झालेल्या निर्णायक चर्चेअंती पुलाच्या उतार भागाची बांधणी कशी असावी, यावर एकमत होऊन हा वाद संपुष्टात आला आहे.

ठळक मुद्देबांधकामाचा मार्ग मोकळा : बल्लारपुरातील समस्या सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील वस्ती आणि डेपो भागाला रहदारीने जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून नगरपरिषदेच्या सहकार्याने केले जात आहे. बरेचसे काम झाले आहे. मात्र, वस्ती भागाकडील पुलाचा उतरणारा भाग कसा असावा, याबाबत पुलाजवळी रहिवासी आणि इतर नागरिक यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. अखेर, यावर दोन्ही बाजुंच्या लोकांशी झालेल्या निर्णायक चर्चेअंती पुलाच्या उतार भागाची बांधणी कशी असावी, यावर एकमत होऊन हा वाद संपुष्टात आला आहे.कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने नवीन आखणीचा नकाशा, त्याला येणारा खर्चास मंजूरी याकरिता बराच वेळ जाणार आहे. यामुळे, पुलाचे काम थोडे लांबणीवर पडले आहे. पण, या पुलाबाबत उफळलेला वाद एकदाचा मिटला. सुमारे ४० वर्षापूर्वी हा उड्डाण पूल तयार बांधण्यात आला. आता तो काहीसा जीर्ण झाला असल्याने रेल्वे विभागाने नगर परिषदेची मदत घेऊन पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. पुलाचा वस्तीकडील उतार भाग तोडून तो पूर्वीसारखाच ठेवण्याचे ठरले होते. परंतु, उतार भागाजवळ असलेल्या रहिवाशांनी आता पुलाचा उतार भाग आमच्या घरांपुढे नको, घरापुढील जागा मोकळी हवी, त्यामुळे तो निमुळता घ्या, असे म्हणत काही भागात पायºया कराव्यात, अशी मागणी करुन या पुलाचे काम बंद पाडले.अखेर, नगर परिषद प्रशासनाने दोन्ही बाजूच्या लोकांना, लोकप्रतिनिधींना बोलावून चर्चा घडवून आणली आणि पूल बांधणीचा सूवर्णमध्य समोर आणून चर्चेअंती त्याला मंजुरी दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेर मिटला. पुलाचे उर्वरीत काम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सभेला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, उपाध्यक्ष मीना चौधरी, रेल्वे विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.