शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश जारी

By admin | Updated: July 24, 2016 00:44 IST

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र लागू करताना विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागणारी अडचणी दूर झाल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : शासन निर्णय निर्गमितचंद्रपूर : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र लागू करताना विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागणारी अडचणी दूर झाल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाने २१ जुलै २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. यापुढे अर्जदारास फक्त जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्रासोबत जर जात प्रमाणपत्र असेल तर त्याच्या सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून फक्त नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्रदेखील मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या संदर्भात विद्यार्थी व पालकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १९ जुलै रोजी प्रधान सचिव सामाजिक न्याय यांच्या समवेत बैठक घेऊन ही अडचण दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २१ जुलै २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य मागास व इतर मागास प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी (उपजिल्हाधिकारी) यांच्याकडून विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र तसेच उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे (नॉनक्रिमीलेयर) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. प्रचलित तरतुदीनुसार जात प्रमाणपत्र प्राप्त करताना अर्जदाराचे मूळगाव ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात येते, त्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडूनच जात प्रमाणपत्र घेता येते. शासन निर्णय २१ जुलै २०१६ अन्वये नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्राचा नमुना निश्चित करून देण्यात आलेला आहे. या नमुन्यानुसार एकाच प्रमाणपत्रात जातीचे प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र काही कारणास्तव आपल्या मूळ गावाहून स्थलांतर केलेल्या नागरिकांना स्थलांतर केलेल्या जागेहून जात प्रमाणपत्र आणि नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळण्यास अडचण निर्माण होत होती. कारण अशा प्रकरणात जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र देणारे प्राधिकारी वेगवेगळे असतात. सध्याच्या स्थायी आदेशानुसार अर्जदाराने मागणी केल्यास त्यास फक्त जात प्रमाणपत्र किंवा नॉनक्रिमीलेअर व जात प्रमाणपत्र एकत्रित असे दोन पर्याय उपलब्ध होते. मात्र ज्याच्याकडे जात प्रमाणपत्र असून केवळ नॉनक्रिमीलेअर हवे आहे, त्यास फक्त नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे अर्जदारांना विशेषत: विद्यार्थ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत असे. आता २१ जुलै २०१६ च्या शासन निर्णयान्वये अर्जदारास फक्त जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्रासोबत जर त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर त्याच्या सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून फक्त नॉनक्रिमीलेअर देखील मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.