नागभीड : उमेद अभियानांतर्गत कार्यरत कॅडरच्या मानधनाचा विषय येत्या महिनाभरात सुटण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन बुधवारी मुख्य कार्यपालन अधिकारी मिताली सेठी यांनी उमेद महिला कल्याणकारी मंडळ यांच्या शिष्टमंडळाला दिले.
उमेद अभियान अंतर्गत काही कॅडरचे मानधन मागील दीड वर्षापासून प्रलंबित असल्याने शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांची भेट घेतली होती. अत्यंत कठीण काळातही अभियानाची सर्व कामे सुरू असून, अनेक उद्दिष्ट पूर्ण करण्यात आली. यात अभियानातील संस्थासोबतच केडरचे महत्वाचे योगदान आहे. मात्र, निधीअभावी काही कॅडरचे मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे शिष्टमंडळानी मुख्य कार्यकारी सेठी यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी सेठी यांनी मानधनाविषयी राज्य कक्षासोबत पाठपुरावा सुरू असून, येत्या महिनाभरात हा विषय बऱ्याचअंशी सुटेल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात उमेद महिला कल्याणकारी मंडळाच्या मुख्य समन्वयक शिल्पा भोस्कर यांच्यासह सलमा शेख, पंचशिला कांबळे, मेघा आवारी, मंजूषा लोहे, कल्पना कुळसंगे उपस्थित होत्या.
230921\img-20210923-wa0009.jpg
निवेदन देतांना उमेदचे शिष्टमंडळ