शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशाह महाराष्ट्रात मग गोंदिया नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना  ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येण्याऐवजी चांदाफोर्टपर्यंत येत आहे. चांदाफोर्ट ते बल्लारशाह दरम्यानच्या १५  किमी अंतरासाठी, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर :  दीर्घ प्रतीक्षेनंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर सुरू केली आहे. बल्लारशाह येथून या पॅसेंजरसाठी तिकिटे उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना चांदाफोर्टला जाऊन ट्रेन पकडावी लागत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गोंदिया पॅसेंजरला बल्लारशाहकडे येण्यास आणि बल्लारशाहमधून प्रवाशांना तिकीट देण्यास मध्य रेल्वे विभागाचा काय आक्षेप आहे. बल्लारशाह महाराष्ट्रात नाही काय, असा थेट प्रश्न झेडआरयूसी सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी उपस्थित केला असून त्यांनी मध्य रेल्वेसह केंद्र, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधीला निवेदन पाठविले आहे.गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना  ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येण्याऐवजी चांदाफोर्टपर्यंत येत आहे. चांदाफोर्ट ते बल्लारशाह दरम्यानच्या १५  किमी अंतरासाठी, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन बल्लारशाह ट्रेन पाठवण्यासाठी आणि प्रवाशांना तिकीट देण्यासाठी तयार आहे, मग मध्य रेल्वे विभागाला यावर आक्षेप का, असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोरोनाचा धोका लक्षात घेता अनारक्षित तिकिटे देण्यास मनाई करण्यात आल्याचे उत्तर मिळाल्याचेही सुंचूवार यांनी म्हटले आहे. गोंदिया पॅसेंजर चालविण्यासाठी परवानगी आहे. मग केवळ बल्लारशाहपर्यंत ट्रेन आणण्यास काय हरकत आहे. बल्लारशाह महाराष्ट्रात नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बल्लारपूरपर्यंत ही ट्रेन सुरु करण्याची मागणी आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अनारक्षित तिकिटे देत आहे. मग मध्य रेल्वेला काय समस्या आहे. एका मंडळासाठी एक नियम आणि दुसऱ्या मंडळासाठी दुसरा? रेल्वे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता ही ट्रेन बल्लारशाहपर्यंत चालवावी आणि बल्लारशाहमधूनही प्रवाशांना तिकिटे द्यावीत. बल्लारशाह महाराष्ट्रात आहे तर गोंदिया महाराष्ट्रात नाही का? -श्रीनिवास सुंचूवार,  झेडआरयूसी सदस्य, मध्य रेल्वे

 

टॅग्स :railwayरेल्वे