शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जारचे पाणी आजार तर देत नाही ना? नागरिकांनो पाण्याच्या शुद्धतेबाबत घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:43 IST

Chandrapur : जिल्ह्याभरात जवळपास शेकडो थंड पाण्याची जार देण्याचे प्रकल्प असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लग्नकार्य तसेच विविध सोहळ्यांमध्ये जारच्या पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. अवघ्या ३० रुपयांत २० लिटर स्वस्त आणि थंड पाणी मिळत असल्याने जारचे पाणी खरेदीकडे यजमानांचा कल असतो. मात्र, या पाण्याच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हे जारचे पाणी आजार तर देत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता घरगुती छोटा-मोठा कार्यक्रम असो किंवा शासकीय वा खासगी कार्यालयातसुद्धा जारच्याच पाण्याचा वापर केला जातो. अनेकजण तर घरीपण दररोज कॅनचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करतात. त्यामुळे शहरापासून ते गावखेड्यापासून जारच्या पाण्याची दुकाने दिसून येतात. वास्तविक, पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी थंड करण्याच्या मशीनमध्ये थंड केल्यानंतर जारमध्ये भरले जाते. परंतु, बरेचदा जारची नीट स्वच्छता केली जात नाही. महिनोन्महिने त्याच जारमध्ये पाणी भरले जाते. कुठे-कुठे तर पाणी थंड करण्यासाठी इथिलिन ग्लायकॉल नावाचा घातक द्रव पदार्थ टाकून पाणी थंड करण्याची प्रक्रिया करीत आहेत. हा संपूर्ण प्रकार नागरिकांच्या जीविताशी खेळणारा असून, किडनी तसेच हृदयावर गंभीर स्वरूपाचा परिणाम करणार आहे. 

२० ते ३० रुपयांत जारचे पाणीमोठ्या शहरापासून गावखेड्यातही जारच्या पाण्याचे प्रोजेक्ट आहेत. २० ते ३० रुपयाला एक जार विक्री केली जाते.

कारवाईअभावी जार संचालक बेपर्वाथंड पाण्याची जार वितरित करण्याची पाण्याच्या शुद्धतेबाबत कुणी तपासणी करत नाही वा कारवाई करत नाही. त्यामुळे हे पाणी वितरित करणारे बेपर्वा झाले असून शुद्धतेकडे दुर्लक्ष करत पाण्याचा पुरवठा करतात.

पाण्याच्या शुद्धतेची जबाबदारी कोणाची ?पाणी वितरण करणारे शुद्ध व थंडगार पाणी वितरित करण्याचा दावा करत असतात. मात्र त्याच्या शुद्धतेबाबत कुणीच काही विचारणा करत नसल्याने जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण होतो.

तपासणी कोण करतो?पाणी शुद्ध आहे की नाही, याबाबतची तपासणी करणे गरजेचे असताना कन्हैया यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater pollutionजल प्रदूषण