शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणासाठी पुगलियांचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

By admin | Updated: September 1, 2015 00:43 IST

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या पहिल्या सत्राला १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे

नामकरणाला मान्यता द्या : फुले-आंबेडकर आणि कन्नमवार यांच्या नावासाठी पत्र चंद्रपूर : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या पहिल्या सत्राला १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या महाविद्यालयासाठी ‘फुले-आंबेडकर’ चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसने जाहीर केले असून नामकरण आणि महाविद्यालयाच्या प्रारंभाचा आनंदोत्सव चंद्रपुरात आयोजित केला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजर राहावे आणि या नामकरणाला मान्यता द्यावी, अशी विनंती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्रातून केली आहे. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘फुले-आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ या नावासोबतच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘कर्मवीर कन्नमवार’ यांचेही नाव त्यांनी जाहीर केले आहे. तत्कालिन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते या महाविद्यालयाच्या ईमारतीचे भूमिपूजन झाले होते. त्यांनी भरीव निधीही दिला होता. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री असलेले मा.सा. कन्नमवार यांचे मूल-सावली हे निर्वाचन क्षेत्र होते. त्या भागातील जनतेने या नावाची शिफारस केल्याने लोकभावनेचा आदर करून या दोन्ही नावांना मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाच्या १ सप्टेंबरपासून होणाऱ्या प्रारंभाचे औचित्य साधून स्थानिक गांधी चौकात नागरिकांकडून नामकरणानिमीत्त आणि महाविद्यालयाच्या स्थापनेचा आनंदोत्सव म्हणून ५६ प्रकारच्या मिठाईच्या वाटपाचा आणि कव्वालीचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. यासाठी त्यांनी एका पत्रातून निमंत्रण दिले आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन्ही वास्तुसाठी आलेली नावे जनतेकडून आहेत. दिवंगत मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्याशी या जिल्ह्यातील जनतेचे नाते आणि भावना जुळलेल्या आहेत. त्यातूनच हे नाव पुढे आले. लोक चर्चेतून ही नावे आल्याने ती अव्हेरणे हा लोक भावनेचा अनादर ठरु शकतो. त्यामुळे या नावाला सरकारकडून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा पुगलिया यांनी व्यक्त केली आहे.यातूनच या नामकरणाची त्यांनी घोषणा केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)नागरिकांनी सहभागी व्हावे - नरेश पुगलियाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘फुले-आंबेडकर’ असे होणारे नामकरण आणि महाविद्यालय स्थापनेनिमीत्त आयोजित केलेला आनंद सोहळा या दोन्ही कार्यक्रमासाठी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेतून केले. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल पुगलिया, चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसचे महासचिव साईनाथ बुचे, काँग्रेस महानगर अध्यक्ष गावंडे गुरूजी, अ‍ॅड. अविनाश ठावरी, माजी नगराध्यक्ष डॉ. महाकुलकर, नगरसीवक प्रविण पडवेकर, अशोक नागापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुगलिया म्हणाले, हा नागरिकांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस असल्याने शहरातील सामाजिक संस्थांच्या वतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमीत्त गांधी चौकात सायंकाळी ५ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या पहिल्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि जनहीत याचिकेच्या माध्यमातून चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देणाऱ्या नागरिकांचा सत्कार केला जाणार आहे. ५६ प्रकारच्या मिठार्इंचे स्टॅल लावले जाणार असून या ५६ भोग मिठाई व नमकीनचे स्टॉल सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी सुरू राहणार आहेत. या सोबतच, सायंकाळी मुंबईचे छोटा मजिद शोला आणि बनारसच्या रेहाना बेग यांच्या कव्वालीचा दुय्यम मुकाबलाही ठेवण्यात आला आहे. वेळेवर पाऊस आल्यास हा कार्यक्रम राजीव गांधी कामगार भवन येथे आणि ५६ भोग मिठाई-नमकीन वाटपाचा कार्यक्रम न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये होईल. नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.