शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उपवर-वधू व पालक परिचय मेळावा

By admin | Updated: January 14, 2017 00:45 IST

महाराष्ट्र विश्कर्मा मय सुतार (झाडे) समाज महासंघ अंतर्गत मयात्मज सुतार (झाडे) समाज, चंद्रपूर व सुतार समाज मेळावा आयोजन ...

सुतार समाजाचे आयोजन : गुणवंत विद्यार्थी व समाजातील कार्यकर्त्यांचा सत्कारचंद्रपूर : महाराष्ट्र विश्कर्मा मय सुतार (झाडे) समाज महासंघ अंतर्गत मयात्मज सुतार (झाडे) समाज, चंद्रपूर व सुतार समाज मेळावा आयोजन कृती समितीच्या विद्यमाने सुतार समाजाचा २९ वा द्विदिवसीय राज्यस्तरीय उपवर-वधू पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे मंगळवारला पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघाचे माजी कार्याध्यक्ष किशोर शास्त्रकार, यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष गरवारे पॉलिस्टर लिमिटेड औरंगाबादचे अध्यक्ष डॉ.विहार राखुंडे, प्रमुख पाहुणे स्थापत्य अभियंता सहायक नरेंद्र वनकर, महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार समाज महासंघाचे अध्यक्ष प्रदीप जानवे, आयोजन कृती समितीचे अध्यक्ष दत्ता ढवळे व महासंघाचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. यावेळी, समाजातील कार्यकर्ते बबनराव राखुंडे , पंजाबराव उर्फ बाबाराव दुधलकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यापूर्वी मेळावे आयोजन केलेल्या माजी अध्यक्षांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप जानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दत्ता ढवळे यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या मेळाव्यात उपवर-वधूंनी पालकांसोबत मंचावर येवून परिचय करून दिला. संचालन प्रमोद माणुसमारे, मोरेश्वर वनकर, अल्का शास्त्रकार, ज्योती राखुडे, माधुरी शास्त्रकार यांनी केले. यावेळी ३०० उपवर-वधूंनी आपला परिचय दिला.यावेळी समाजातील गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन प्रभाकर नवघरे यांनी केले. यशस्वीतेसाठी दत्ता ढवळे, प्रभाकर नवघरे, मारोतराव परसुटकर, सतीश माणुसरमारे, सुभाष बुरडकर, अमित माणुसमारे आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)