शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा धाक दाखवून वनाधिकाऱ्याला आठ लाखांनी ऑनलाईन गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 14:51 IST

अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा : बँकेची माहिती व पगार पत्रकही मागितले

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : येथील वन विभागात कार्यरत उच्चपदस्थ वन अधिकाऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून ८ लाख २० हजारांनी गंडविल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) उघडकीस आली. एका उच्चशिक्षित महिलेलाही ३१ लाखांनी फसल्याची घटना गुरुवारी उजेडात आली होती. अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

फिर्यादी वनविभागात अधिकारीपदी कार्यरत आहेत. ५ ते १५ ऑक्टोबर २०२४ कालावधीत त्यांना अनोळखी मोबाइलवरून ट्रायच्या नावाने कॉल आला. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, तुमचा आधार कार्डशी संबंधित सगळे मोबाइल नंबर बंद करण्यात येईल. त्यांना एक नंबर सांगण्यात आला आणि या नंबरवरून असामान्य कॉल झाले. तुमच्यावर नवी दिल्ली येथील पोलिस विभागाच्या गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली. त्यासाठी तुम्हाला व्यक्तीस यावे लागेल. तेव्हा तक्रारदार अधिकाऱ्याने दिल्ली येणे शक्य नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर कॉलरने ऑनलाइन तक्रार दाखल करायला त्यांनी दुसरा नंबर दिला. 

दरम्यान, आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वन अधिकाऱ्याने बल्लारपूर सोमवारी (दि. २१) बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत ६६ (क), ६६ (ड) ची गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे करीत आहेत. 

सीबीआयचाही दाखविला धाक अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन माहिती मागितल्याने वन अधिकाऱ्याने संपर्क केले. तेव्हा कॉलरने गोपनीयता म्हणून सीबीआय इंडियाशी सहकार्य करावयाचे असून तुमचे सर्व फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड व वेतन, बचतीसंदर्भातील माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलामार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संरक्षणात द्यायचे आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली. तेव्हा वन अधिकाऱ्याने भीतीपोटी कॉलरने दिलेल्या क्रमांकावर ७ लाख ९० हजार रुपये आरटीजीएस केले. शिवाय फोन पेद्वारे २० हजार रुपये असे एकूण ८ लाख १० हजार रुपये जमा केले.

टॅग्स :fraudधोकेबाजीchandrapur-acचंद्रपूर