शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवासाठी चंद्रपुरात जय्यत तयारी

By admin | Updated: February 19, 2017 00:37 IST

येत्या २४ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात प्रारंभ होत असलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय माहितीचित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

विविध विषयांवर मंथन होणार : चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज चंद्रपुरात येणारचंद्रपूर : येत्या २४ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात प्रारंभ होत असलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय माहितीचित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारे संकलित या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आयोजकांकडे प्राप्त झाली आहे. मानवी मुल्यांची विविध अंतरंगे उकलून समाज जीवनातील अनेक घृणास्पद परंपरांवर प्रहार करून अंर्तबोध जागविणारी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त दर्जेदार तारांकित माहिती चित्रपटांची प्रदर्शने हे या महोत्सवाचे वैशिष्ठे ठरणार आहे.तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील उत्कृष्ट अशा ३३ माहिती चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जेदार ‘आस्कर’ पुरस्कारांनी सन्मानित अनेक माहिती चित्रपटांचा या सुचित समावेश करण्यात आला आहे. दादासाहेब फाळकेद्वारा निर्देशित प्रथम भारतीय बोल चित्रपट राजा हरिश्चंद्रपासून आजतागायतच्या संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीची स्थित्यंतरे प्रदर्शित करणाऱ्या माहितीपटांद्वारे या प्रदर्शनीची सांगता होईल.चंद्रपूर आणि परिसरातील चित्रीकरण क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण या महोत्सवादरम्यान दिले जाणार असून या महोत्सवात त्यांच्यासाठी विशेष सत्र चालणार आहे. आंतरराष्ट्रीय माहितीचित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूरचा प्राचीन इतिहास, निसर्ग व वन्यजीवनाशी नाते जगणारे तसेच चंद्रपूरच्या सांस्कृतिक सामाजिक वारस्याची जतन करणारी व्यक्तीमत्त्वे यांची दखल घेण्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे. मनिष देसाई निर्देशक चित्रपट विभाग तथा शांतराम पोटदुखे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा सांभाळीत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार असून ना. सुधीर मुनगंटीवार हे या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी असतील.याप्रसंगी सचिव माहिती व प्रसारण मंत्रालय अजय मित्तल, माजी न्यायाधीश विकास सिरपुरकर, आॅस्कर विजेते चित्रपट निर्माते माईक पांडे, चित्रपट निर्माते निर्देशक किरण शांताराम, सैराट फेम नागराज मंजुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती या महोत्सवात राहणार आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)