चंद्रपूर : येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदा अल्लूरवार यांना जिल्हाभरात राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन त्यांना वर्ल्ड कॉन्स्टिट्युशन ॲण्ड पार्लमेंट असोशिएशनच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रम वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे साहित्यिक खंडू माळवे आदी उपस्थित होते. नंदा अल्लूरवार यांनी साईबाबा बहुऊद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. त्याच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वीही त्यांना जिल्हा पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. प्रास्ताविक डॉ. दत्ता विघावे तर आभार डॉ. दादाराव मस्के यांनीी मानले.
नंदा अल्लुरवार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST