संजय धोटे : अद्ययावत विकसित शेतीकडे वाटचाल करावीलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आजची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने अद्यावत शेती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीला पूरक व्यवसायासह शेती विकसीत करणे आवश्यक आहे. शेतातील उत्पादनासोबतच लघु उद्योग किंवा जोडधंदा करुन उत्पादन क्षमता वाढविण्यावर जास्त भर असावा. त्यामुळे शेतकरी शेतीला एक नवीन चालना देईल, असे मत आमदार संजय धोटे यांनी लक्कडकोट येथील शेतशिवार बांधावर शिवार योजनेविषयी माहिती देताना व्यक्त केले.केंद्र व राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध प्रकारच्या योजना सुरु आहेत. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. शासनाचे वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी निमत्ताने शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष गावाना भेटी दिली. शिवारावर जावून येथील कामे बघून समस्याची माहिती शासनाचे वतीने घेण्यात येत आहेत. संवाद साधताना त्या भागातील सिंचन मामा तलाव बोडी, जल युक्त शिवार, टिंबक सिंचन, भोग नं. २ चे सातबारा प्रकरण, आत्माविषयक कृषी योजनेसंदर्भात रस्ते नाली दुरुस्ती संदर्भात तसेच इतर विषयावर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी कामाची पाहणीसुद्धा करण्यात आली. या बैठकीत कृषी विषयक, पंचायत समिती विषयक तसेच तहसील विभाग अंतर्गत आणि आत्मा अंतर्गत विविध शेतकऱ्यांचा योजनाची माहिती ग्रामस्थाना शेतकऱ्यांना देण्यात आली. या संवाद बैठकीत आ. अॅड. धोटे यांच्यासह तहसीलदार धर्मेश फुसाटे, संवर्ग विकास अधिकारी राणावत, आत्माच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर आत्मा, कृषी अधिकारी रवी राठोड, तालुका महामंत्री दिलीप वांढरे व गावातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.या सोबतच आमदारांनीया भागातील पाण्याची, सिंचनाची समस्या तात्काळ दूर होईल आणि प्रलंबित प्रकल्पाचे काम त्वरीत सुरु कऱ्यासंदर्भात बैठक लावून सदर प्रश्न निकाली काढू असे सुद्धा सांगितले व शेतकऱ्यांना शेती विषयक उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने गायी, फळ बागायत नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती विकसित करण्याचे तसेच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आणि शेती सोबतच जोडधंदा, लघु उद्योग निर्माण करण्याकरिता आपण सर्व मिळून प्रयत्न करु असे, आवाहन यावेळी आ. अॅड. धोटे यांनी केले.
शेतशिवार बांधावर शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:38 IST