शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या तीव्रतेने जिवती परिसरातील पिके करपली

By admin | Updated: September 29, 2014 00:42 IST

माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने

जिवती : माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने दिलेली हुलकावणी आणि कडक उन्हाच्या तडाख्यामुळे शेतातील उभी पिके करपत असून यावर्षीही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा तसा डोंगराळ व खरीप हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो. सिंचन क्षेत्रही तालुक्यात अगदी बोटावर मोजण्याइतके आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे भवितव्य सर्वस्वी खरिपाच्या पेरणीवर अवलंबून आहे. सुरुवातीच्या मध्यम हलक्या पावसाने खरीप हंगामाची सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी पूर्णत: खचला गेला. दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली. कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला शेतकरी पोळ्यानंतर समाधानकारक पावसामुळे सावरणार अशी आशा निर्माण झाली होती. सर्वत्र हिरवीगार पिके आणि जोमाने वाढ होत असल्याचे दिसत होते. मात्र वरुणराजाची अवकृपा झाली. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी बसला आहे. परंतु पावसाने चांगलीच दडी मारल्याने कडाक्याचा ऊन पडू लागला आहे. हिरवीगार असलेली पिके आठवडाभरातच करपत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आता हिरावला जात आहे. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी बँक, सावकारचे उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांने खर्च केला. महागाईच्या काळात बियाणे खरेदी करुन काळ्या आईची ओटी भरली. समाधानकारक पिके येणार, अशी अपेक्षा घेवून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात करपलेली पिके अन् अश्रूच्या धारा दिसू लागल्या आहे.सध्या परिसरात विधानसभा निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांची पीक परिस्थिती कशी आहे, हे विचारणारे कार्यकर्ते आता मतदान कुणाच्या बाजुने होणार, अशी समीकरणे जुळविण्यात व्यस्त आहेत. निसर्गाच्या हुलकावणीने खरीप हंगाम धोक्यात आहे. महत्वाचा मानला जाणारा दिवाळी सण जवळ आला आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबिनच्या शेंगा भरल्या नाहीत. कापसाच्या झाडाला बोंडे लागण्याआधीच डोळ्यादेखत कपाशी करपत आहे. खासगी सावकार, बकेचे कर्ज फेडायचे, आणि दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न आता पहाडावरील शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास रोजगारासाठी अनेक जण स्थलांतर करण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)