घोसरी: मूल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बेंबाळ ग्रामपंचायतच्या सरपंच करुणा उराडे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी पारित केलेला ठराव शासन परिपत्रकान्वये अवैध असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अविश्वासाबाबत विशेष ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहे. गुरुवारी होणाऱ्या ग्रामसभेतून अविश्वास पारित होणार की बारगळला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बेंबाळच्या सरपंच करुणा उराडे यांची निवड गावातील मतदारांकडून थेट झालेली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणण्याचा अधिकारसुध्दा सर्व मतदारांनाच असावा, याबाबत शासनाने १ सप्टेंबर २०१७ च्या परिपत्रकान्वये नमूद केलेले आहे. तरीपण ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दि. १८ जून रोजी घेतलेल्या सभेत १० विरुद्ध ० अशा मतांनी अविश्वास पारित करण्यात आला होता.
परंतु शासनाच्या १ सप्टेंबर २०१७ च्या परिपत्रकान्वये सरपंच करुणा उराडे यांनी सदर अविश्वास अवैध असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती. जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना सरपंचाविरुध्द पारित अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार गुरुवारी होऊ घातलेल्या विशेष ग्रामसभेला महत्त्व प्राप्त झालेले आहे. भाजपचे एकहाती वर्चस्व असलेल्या बेंबाळ ग्रामपंचायतीच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळणार हे विशेष.
210721\img_20210618_185025.jpg
बेंबाळच्या सरपंचा करुणा उराडे यांचेवरील अविश्वासाबाबत विशेष ग्रामसभा