तळोधी बा. : नागभीड तालुक्यात धानपिकासोबत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुर पिकाची लागवड केली आहे .परंतु एकीकडे शेतकरी मावा तुडतुड्यांमुळे संकटात सापडलेला असताना तुर पिकावर अळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
खर्चापेक्षा कमी उत्पादन होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी महागडी औषध घेऊन फवारणी करीत असल्याने दुहेरी संकटात सापडला आहे. कृषी विभागाने सर्वे करुन शेतकऱ्यांना मोफत औषध पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .