शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण महिलांच्या जीवनात होत आहे नवपरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:26 IST

प्रधानमंत्री उज्वला गॅस, योजना महिलांसाठी नवसंजिवनी ठरली आहे. गॅस कनेक्शन मिळणे हे ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबीयांना कठीण जात होते. नियोजन आणि दूरदृष्टीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही बाब शक्य करून दाखविली आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : उज्ज्वला गॅस योजना ठरत आहे लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री उज्वला गॅस, योजना महिलांसाठी नवसंजिवनी ठरली आहे. गॅस कनेक्शन मिळणे हे ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबीयांना कठीण जात होते. नियोजन आणि दूरदृष्टीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही बाब शक्य करून दाखविली आहे. गेली कित्येक वर्ष ग्रामीण भागातील महिलांच्या नशिबी चूल आणि धूर पाचवीला पूजला होता. तो उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून दूर होत आहे. हे सरकारचे मोठे यश असून आज देशातील हजारो खेडी धुरमुक्त होतानाच त्यांचे आरोग्यही सुरक्षित राहिले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबापर्यंत आज स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन पोहचले असल्याने ही नवक्रांती असून यापुढेही ग्रामीण महिलांच्या जीवनात नवपरिवर्तनाची पहाट उजेळल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.कुंभेझरी येथील उज्ज्वला दिवस व ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते. निवृत्ती एचपी गॅस एजन्सी जिवतीच्या वतीने शुक्रवारी कुंभेझरी येथील गोरगरीब महिलांना घरगुती गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार अ‍ॅड.संजय धोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्री, जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन, जिवतीचे तहसिलदार गोपीनाथ चव्हाण, खुशाल बोंडे, जिल्हा परिषदेच्या सभापती गोदावरी केंदे्र, पं. स. उपसभापती महेश देवकते, भाजपा किसान आघाडीचे महामंत्री राजु घरोटे, आदिवासी नेते वाघु गेडाम, एच. पी. गॅसचे सेल्स आॅफीसर आशिष कुमार, प्रशांत गुंडावार आदींची उपस्थिती होती. आता विस्तारित उज्ज्वला योजनेद्वारे कनेक्शनपासून वंचित गोरगरीब महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण केले जाणार आहे. कोणतेही कुटुंब या अत्यावश्यक सोयीपासून वंचित राहणार नाही. ही केंद्र सरकारची धारणा आहे. प्रत्येक घरात वीज व गॅस कनेक्शनकरिता सरकार कटीबद्ध असल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. ग्राम स्वराज्य अभियानाद्वारे गावात लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही ना. अहीर म्हणाले. याप्रसंगी ना. अहीर व अतिथींच्या हस्ते गॅसचे वितरण सोबतच राशनकार्ड देण्यात आले.