चंद्रपूर : जखमी जनावरांसाठी चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशन कार्य करीत आहे. त्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने जनावरे ठेवण्यासाठी पिंजरा व त्यांच्या खाद्यांसाठी आर्थिक मदत करण्यात आली. चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशन रस्त्यावरील जखमी जनावरांवर आपल्या केंद्रात उपचार करीत असून, त्यांचा सांभाळ करीत आहे. सद्यस्थितीत त्यांच्या केंद्रात २८० जनावरे आहेत. डॉ. देवेंद्र रापेल्लीवार व त्यांची चमू त्यांचा सांभाळ करीत आहे. या केंद्राला इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी भेट दिली. यावेळी जनावरे ठेवण्यासाठी पिंजरा व खाद्य खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, सचिव शकुंतला गोयल, मीरा अग्रवाल आदी उपस्थित होत्या. देवेंद्र रापेल्लीवार यांनी आभार मानले.
जनावरांच्या सुरक्षिततेसाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST