शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

शेतमालाच्या आधारभूत किमतीबाबत अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:35 IST

केंद्र सरकारने शेतमालाच्या आधारभूत किमती घोषित करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

वामनराव चटप : केंद्र सरकारद्वारे पुन्हा शेतकऱ्यांचा विश्वासघातलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने शेतमालाच्या आधारभूत किमती घोषित करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतमाल उत्पादन करण्यासाठी येणाऱ्या खर्चात सतत वाढ होत असते आणि शेतमालाचे रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. देशभर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय न देता सरकारने शेतमालाच्या अत्यल्प आधारभूत किंमतीवाढीचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी उत्पादन खर्च व त्यावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले असताना आता चौथ्याही वर्षी शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केला आहे.केंद्र सरकारने सन २०१७-१८ या वर्षाकरिता खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती घोषित केल्या आहे. कापसाला प्रति क्विंटल १६० रु. धानाला प्रति क्विंटल ५० रु. आणि सोयाबीनला प्रति क्विंटल २७५ रु. अशी नगण्य वाढ केली आहे. केंद्र सरकारने देशात सातव्या वेतन आयोगाची कर्मचाऱ्यांची पगारवाढ २३.५५ टक्के केली असताना शेतकऱ्यांना मात्र आत्महत्येच्या खाईत लोटण्याचा मार्ग खुला ठेवला आहे. १ जुलै २०१७ ते ३० जून २०१८ या कृषी आर्थिक वर्षासाठी कापसाची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ४३२० रु. सोयाबिन ३०५० रु. व धान १५६० रु. याप्रमाणे घोषित केली आहे. हीच किंमत मागील वर्षी कापूस ४१६० रु. सोयाबीन २७७५ रु. व धान १५१० रु. एवढी होती. केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने परिवर्तनाचा नारा देत व अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवून आणि शेतकरी हिताचा आव आणून मतांचा जोगवा मागितला होता. भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करुन देईल आणि काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांबाबत केलेल्या अन्यायाचे परीमार्जन करेल, अशी अपेक्षा देशातील शेतकऱ्यांना होती. असे अभिवचनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. परंतु सत्तेवर येताच भाजपचा शेतकरीविरोधी चेहरा उघड झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र सुरुच असून ते वाढत आहे. मागील तीन वर्ष केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. या चौथ्या वर्षी देशभर झालेली प्रचंड शेतकरी आंदोलने आणि कर्जमाफीचा मुद्दा यामुळे यापुढे कर्जमाफीची पाळी येऊच नये म्हणून आधरभूत किंमतीत घसघसीत वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या आधारभूत किंमतीत केलेल्या अत्यल्प वाढीमुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटात टाकले आहे, असेही अ‍ॅड. वामनराव चटप यांनी म्हटले आहे.सरकारच्या या धोरणाचा शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रभाकर दिवे, अनिल ठाकूरवार, अरुण नवले, पोर्णिमा निरंजणे, निलकंठ कोरांगे, राजेश कवठे, कमल वडस्कर, अ‍ॅड. शरद कारेकर, सुधीर सातपुते, अ‍ॅड. नि. गो. मोरांडे, रघुनाथराव सहारे, प्रा. रामभाऊ पारखी, हरिदास बोरकुटे, विवेक मांदाडे, कवडू येनप्रेडीवार, अशोक मुसळे, रमेश नळे, दिवाकर मानुसमारे, मारोतराव काकडे, बंडू राजूरकर, मदनपाटील सातपुते, तुकेश वानोडे, वासुदेव उरकुडे, कवडू बुटले आदींनी यांनी निषेध केला असून सरकारने शेतकरीविरोधी धोरण सोडावे, अशी मागणीही केली आहे.