लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगरझरी येथे बफर झोनमध्ये शनिवारी एक वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. पूर्ण वाढ झालेला हा वाघ किमान नऊ ते दहा वर्षांचा असावा असा अंदाज आहे.त्याच्या मागच्या दोन्ही पायांवर जखमा असल्याने त्याला नीट चालता येत नव्हते. त्याला रविवारी इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले व उपचारासाठी गोरेवाडा येथे रवाना करण्यात आले आहे.
ताडोबाच्या जंगलात आढळला जखमी वाघ; उपचारासाठी नागपूरला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 19:07 IST