शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

जखमी करून रुग्णवाहिका पळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:28 IST

रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात पोहोचविण्याचे सरकारी आदेश आहेत. मात्र, धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेनेच दुचाकीला धडक मारल्याने दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडला.

ठळक मुद्देभटाळी फाट्याजवळील अपघात : चालक व डॉक्टरांचा बेजबाबदारपणा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात पोहोचविण्याचे सरकारी आदेश आहेत. मात्र, धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेनेच दुचाकीला धडक मारल्याने दुचाकीस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडला. असे असताना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी रुग्णवाहिका पुढे दामटून कोठारी ठाण्यात लावल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता भटाळी फाट्याजवळ घडली. या घटनेने गोंडपिपरी येथील सोनटक्के कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.गोंडपिपरी येथील आनंदराव नामदेव सोनटक्के (५४) व मिलिंंद फुलझेले हे एमएच ३३-७३३३ दुचाकीने चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एमएच ३१ सीक्यू -२६४२५ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने मागून दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत आनंदराव सोनटक्के हे रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत होते. या रुग्णवाहिकेत धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका ही मंडळी बसली होती, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. रक्तबंबाळ अवस्थेतील सोनटक्के यांना रुग्णवाहिकेत बसवून तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, चालकाने रुग्णवाहिका दामटून कोठारीकडे रवाना झाले. हा प्रकार पाहून हादरलेल्या फुलझेले यांनी अन्य वाहनांना थांबविण्यासाठी गयावया केली. पण, एक तासापर्यंत कोणतेही वाहन थांबले नाही. दरम्यान, मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी हे आनंदराव यांना ओळखत असल्याने वाहन थांबविले. सोनटक्के यांना ग्रामीण रुग्णालयात दाखले केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.-तर जीव वाचला असताधाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक व सेविका आदी कर्मचारी बसले होते. अपघातानंतर लगेच रुग्णालयात दाखल केले असते तर वडिलाचा मृत्यू झाला नसता. यासाठी रुग्णवाहिकेतील संंबंधित कर्मचारीच दोषी असल्याने कारवाई करावी, अशी मागणी चंद्रशेखर सोनटक्के यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली आहे.रूग्णवाहिकेत माझ्यासह अन्य आरोग्य कर्मचारी बसले होते. आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने दुचाकीच्या मागील बाजूस धडक दिली. हा प्रकार वाहन चालकाच्या लक्षात आला नसावा.- विजया धात्रक,वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र, धाबा