शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमानुष ! चंद्रपुरात कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला पेट्रोल टाकून जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 20:53 IST

चहाटपरीवर केलेल्या कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला मालकाने पेट्रोल टाकून जाळले. ही थरारक घटना चंद्रपुरातील गंजवॉर्डातील एका चहा टपरीवर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमन सुन्न करणारी घटनापैशावरून झाला वाद

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चहाटपरीवर केलेल्या कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला मालकाने पेट्रोल टाकून जाळले. ही थरारक घटना चंद्रपुरातील गंजवॉर्डातील एका चहा टपरीवर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. भोजराव प्रेमलाल किल्लेकर (४०) रा. बिनबा गेट, चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी देवीदास गंगाधर धामनगे (४२) रा. ताडबन, अंचलेश्र्वर वॉर्ड, चंद्रपूर याला अटक केली आहे.भोजराव हा देवीदास धामनगे याच्या चहाटपरीवर सकाळी पाणी भरुन दुकानाची स्वच्छता करण्याचे काम करीत होता. त्यासोबतच तो गंजवॉर्डमध्ये हमालीचे काम करायचा. गुरुवारी रात्री भोजराव आपल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी गेला. दरम्यान दोघांमध्ये पैशावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर देवीदासने भोजरावच्या पाठीवर हातोडीने गंभीर घाव घातला. यामध्ये तो खाली पडला. त्यानंतर देवीदास धामनगे या चहापटरी मालकाने त्याच्यावर पेट्रोल ओतून जाळले. त्याला नागरिकांनी गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपरार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा भोजरावची प्राणज्योत मालवली. परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती शहर पोलीस स्टेशनला दिली. लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार एस. एस. भगत, पीएसआय कावडे, एपीआय कोंडावार, हेडकॉन्स्टेबल जीवतोडे, पाल, संघमित्रा कांबळे घटनास्थळावर दाखल झाले. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा