शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

योजनांच्या जनजागृतीसाठी माहितीदूत प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:34 IST

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयुवा माहिती दूत उपक्रम : स्वातंत्र्यदिनी लोगोचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून माहितीदूत शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविणार आहेत.यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकरी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपा आयुक्त संजय काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके आदी उपस्थित होते.विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या अंतर्गत लाभार्थ्यापर्यंत दुहेरी संवादातून शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यास समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याच्या हेतूने युवा माहिती दूत या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी युवा माहिती दूत हे मोबाईल अप्लीकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन युवा माहिती दूत व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या उपक्रमासाठी स्वेच्छेने तयार असलेल्या किंवा निवडण्यात आलेले विद्यार्थी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राज्य शासनाचे युवा माहिती दूत असतील. या कालावधीत किमान ५० प्रस्तावित लाभार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी लागू असणाºया योजनांची माहिती देतील. युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्य शासनाकरिता काम करण्याचे महत्वाची संधी लोकांना मिळेल. युवा माहिती दूत अशी ओळख राज्य शासनाच्यावतीने त्यांना सहा महिन्याकरिता देण्यात येईल. ठरवून दिलेले काम दिल्यानंतर या युवा माहिती दूतांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या सहकार्याने मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार