शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेच्या सामग्रीला महागाईच्या झळा

By admin | Updated: June 8, 2017 03:23 IST

जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला असून बुधवारी आठवडे बाजारात वटसावित्रीच्या सामग्रीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. उपवासाचा हा दिवस मोठ्या श्रद्धेचा मानला जातो. आधुनिक काळातही त्याचा महिमा तसूभरही कमी झालेला नाही. या व्रतासाठी विक्रमगडमधील नवविवाहीता तीन दिवस उपवास करुन चौथ्या दिवशी विधीवत पूजा करतात. त्या वेळेस पूजेसाठी लागणाऱ्या करंडाफणी, आंब्यांचे वाण, हळद-कुंकू, हिरव्या बांगडया, खारीक, बदाम, सुपारी, फणस यांचे दर वाढलेले आहेत. वट पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यालाही महागाइची झळ बसली असून त्यांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहेत. आंबा एक नग ५ ते १० रुपये, करडांफणी ८ ते १० रुपये, हिरव्या बांगडया २५ ते ३० रुपये डझन, फणस गरा ४ ते ५ रुपये, खरीक एक नग ४ ते ५ रुपये, बदाम एक नग ४ ते ५ रुपये, हळद-कुंकू १५ ते २० रुपये, सुपारी एक नग ५ ते १० रुपये अशी वाढ झाली आहे.>‘जुन्या परंपरा मोडल्या जात आहेत’पूर्वी गावात एक ते दोनच ठिकाणी वडाखाली पूजा केली जात असे. परंतु, आता ही परंपरा लोप पावत चालेली असून ग्रामीण भाग सोडला तर शहरी भागात वडाच्या फांद्या देवळात आणून अनेक ठिकाणी पुजा मांडल्या जातात. महिला आपल्या सवडीनुसार येऊन पूजा करतात़ पूर्वी असे नव्हते आता आधुनिक युगाबरोबर परंपराही मोडल्या जात आहेत़, अशी खंत विक्रमगड येथील ज्येष्ठ महिला कमल औसरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केली.वटपूजन दुपारी साडेबारापर्यंतच : दाते पंचागवटपौर्णिमा गुरुवारी ८ जून रोजी दुपारी ४़ ३० नंतर शुक्रवारपर्यत आहे़ पण चतुर्दशी ही गुरुवारी आहे़ आणि तिसऱ्या प्रहरापासून पूजन करावयाचे असते़ म्हणून पूजन हे गुरुवारी सूर्योदयापसून ते मध्यान्ह पर्यंत म्हणजेच दु़ १२.३० पर्यतच करणे बंधकारक आहे. तरी सर्व महिलांनी दु. १२़ ३० पर्यतच पूजन करावे नवीन व्रत करणाऱ्यांनी सकाळी ७़ ते ८ व ११ ते १२़ ३० पर्यत पूजन करावे असे दाते पंचांगमध्ये म्हंटले आहे़ वटासावित्रीचे व्रत अतिशय पवित्र आणि मांगल्याचे मानले जाते़ त्यासाठी पौर्णिमेच्या आदल्या दोन दिवस व पौर्णिमा झाल्यावर चंद्रोदय होईपर्यत असे एकूण चार दिवस उपवास करतात. - भुरी धवल पटेल,अजूनही जुनी परंपरा विक्रमगड व ग्रामीण भागात महिलांनी जोपसली असून आधुनिक काळातही नवविवाहीत सौभाग्यवती आपल्या पतीसाठी चार दिवस उपवास करते व हे व्रत पूर्ण करते़- रजनी अरुण मनारे , विक्रमगड