शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खांद्याच्या वेदना वाढल्या; 'फ्रोझन शोल्डर' नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 11:42 IST

Chandrapur : सततच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : साधारणतः खांद्याच्या दुखण्याकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, असे करणे धोक्याचे ठरू शकतो. यातून 'फ्रोझन शोल्डर' होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अधूनमधून खांदे दुखत असल्यास वेळीच अस्थिरोग तज्ज्ञांना दाखवून उपचार करावा, असा सल्ला अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुनील मल्लोजवार यांनी दिला आहे.

साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर फ्रोझन शोल्डरचा धोका अधिक असतो. खांदे दुखणे आणि नीट काम न करणे ही त्यातील प्रमुख लक्षणे आहेत. फ्रोझन शोल्डरमुळे माणसाला दैनंदिन काम करतानाही खूप अडचणी येतात. 

काय काळजी घ्याल? फ्रोझन शोल्डर साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर होण्याचा धोका असतो. महिलांना अधिक धोका असतो. खांद्याची नियमित हालचाल करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम करावा, एखाद्या वेळेस अपघात झाला आणि योग्य उपचार झाला नाही तर फ्रोझन शोल्डर होण्याचा धोका अधिक असतो.

फ्रोझन शोल्डर' म्हणजे काय? फ्रोझन शोल्डर ज्याला 'अॅड- हेसिव्ह कॅप्सुलिटिस देखील म्हणतात. खांद्याच्या सांध्यामध्ये आखडलेपणा आणि त्यातून होणाऱ्या वेदनांचा सामना करावा लागतो. फ्रोझन शोल्डरची चिन्हे आणि लक्षणे खूप हळूहळू दिसायला लागतात.

मधुमेह, थायरॉईडच्या रुग्णांना धोका अधिक मधुमेह, थायरॉईडच्या रुग्णांमध्ये फ्रोझन शोल्डरचा धोका १० ते २० टक्के असतो. फ्रोझन शोल्डरची समस्या लगेच सुटत नाही. ते बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो.

फ्रोझन शोल्डरची कारणे खांद्याच्या जॉइंटच्या बाहेर एक कॅप्सूल असते, गोठलेल्या खांद्यामध्ये ही कॅप्सूल कठोर किंवा कडक होते, ज्यामुळे खांद्याची हालचाल खूप कमी होते. या समस्येचा सामना कोणालाही होऊ शकतो; परंतु, दीर्घकाळ खांदा स्थिर राहिल्यानंतर, जसे की शस्त्रक्रिया किंवा हातास फ्रैक्चर झाल्यानंतर फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता असते.

ऐका.. अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला "खांद्याच्या स्नायूमध्ये कडकपणा आल्यास फ्रोझन शोल्डरचा धोका अधिक असतो. यात तीव्र वेदना होत असतात. साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर फ्रोझन शोल्डरचा धोका अधिक असतो. त्यामुळे या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे असते. मधुमेहाची व्याधी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. खांद्यामध्ये सतत दुखत असेल तर दुर्लक्ष न करता अस्थिरोग तज्ज्ञांना दाखवून उपचार घ्यावा. मधुमेह, थायरॉईडच्या रुग्णांना धोका अधिक मधुमेह, थायरॉईडच्या रुग्णांमध्ये फ्रोझन शोल्डरचा धोका १० ते २० टक्के असतो. फ्रोझन शोल्डरची समस्या लगेच सुटत नाही. ते बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो." - डॉ. सुनील मल्लोजवार, अस्थिरोग तज्ज्ञ, जनता कॉलेजजवळ, चंद्रपूर

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर