लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यावर शिक्कामोर्तब केले. या घटनेला बुधवारी एक वर्षे पूर्ण होत आहे. दारू विक्रीतून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला १५ कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान, दारू विक्रीचा वेग लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाला २० कोटी ७५ लाखांचा टार्गेट देण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदीसाठी संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर अनेक संघटना हे काम करीत होत्या; पण चंद्रपुरात ५ जून २०१० ला दारूबंदीचा खरा लढा सुरू झाला. चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूल श्रमिक एल्गार संघटनेने दारूबंदीची मागणी करणाऱ्या संघटनांना संघटित केले. ४ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२० रोजी दारूबंदीच्या मागणीसाठी चिमूर ते नागपूर पदयात्रा (विधानसभेवर) काढण्यात आली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आवाज उठविला. त्यामुळे फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती तयार केली.समितीने फेब्रुवारी २०१२ मध्ये मुख्यमंत्र्यांना अहवाल सुपुर्द केला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. राज्यातील सत्ता बदलानंतर २७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविली. प्रत्यक्षात ७ जून २०२१ पासून दारूविक्री सुरू झाली. जिल्ह्याला एप्रिल २०२२ पर्यंत १५ कोटींचा महसूल मिळाला आहे.
२ लाख ८२ हजार सूचना आल्याडॉ. कुणाल खेमनार समितीने मार्च २०२० मध्ये अहवाल कॅबिनेटपुढे सादर केला. समितीपुढे ४३ हजार ६२७ निवेदन दारूबंदी उठवण्यासाठी तर २५ हजार ८२७ हे दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आली होती.
१३ सदस्यांची झा समितीमंत्रालयात पुन्हा उच्चस्तरीय बैठक झाली, या बैठकीत आणखी एक समिती स्थापून आढावा घेण्याचे निश्चित झाले. दारूबंदीबाबत अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी १२ जानेवारी २०२१ रोजी १३ सदस्यांची झा समिती गठित झाली. या समितीने ११ मार्चला सरकारला अहवाल दिला.
दारूबंदी हटविण्यासाठी नेमके काय-काय घडले ?३ फेब्रुवारी २०२० पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना समिती गठित करण्याचे निर्देश दिले. दारूबंदीचे फायदे व तोटे याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. खेमनार यांच्या अध्यक्षेखाली समीक्षा समितीने १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत लिखित स्वरूपात अभिप्राय मागविले होते.
२७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने हटविली दारूबंदीझा समितीच्या शिफारशीनंतर राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ७ जून २०२१ पासून जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू झाली. आता दुकानाची संख्या वाढली.