शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा टक्का वाढल्याने जिल्ह्यातील निर्बंध हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

 राज्य शासनाने काेरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी निर्बंध लागू केले होते. त्यातील  निकषांत बदल करण्यात आला. आता ३० जानेवारी २०२२ रोजी पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण ७० टक्के असेल, अशा जिल्ह्यांत निर्बंधात शिथिलता देण्याच्या शासनाच्या सूचना आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला डोस ९४.७१ टक्के तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ७२.२१ टक्के आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढून राज्य शासनाच्या निकषात पात्र ठरल्याने कोरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी लागू केलेले निर्बंध  हटविण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जारी केला. या आदेशानुसार विवाहाला आता २०० जण उपस्थित राहू शकतात. शिवाय, खुल्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही परवागनी देण्यात आली आहे. राज्य शासनाने काेरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी निर्बंध लागू केले होते. त्यातील  निकषांत बदल करण्यात आला. आता ३० जानेवारी २०२२ रोजी पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण ७० टक्के असेल, अशा जिल्ह्यांत निर्बंधात शिथिलता देण्याच्या शासनाच्या सूचना आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला डोस ९४.७१ टक्के तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ७२.२१ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील यापूर्वीच्या सवलती लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केला आहे.

सर्व उद्याने व बगीचे फुलणारस्थानिक प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार उद्याने,  जलतरण तलाव, जल उद्याने, बगीचे, मनाेरंजन पार्क, थीम पार्क, रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेसह सुरू  राहणार आहेत. शहरी भागाचे अधिकार हे मनपा आयुक्त, मुख्याधिकारी नगर परिषद, पंचायत यांना व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना देण्यात आले.

अन्यथा कारवाईचा बडगाशहरी व ग्रामीण भागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना राहतील. भजन आणि इतर सर्व सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना हॉल, पंडालच्या ५० टक्के क्षमतेसह परवानगी राहील. यासाठी संबंधित तहसीलदारांची परवानगी अनिवार्य असेल, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार, अशा सूचना प्रशासनाने दिल्या.

अशा आहेत सवलती  राष्ट्रीय उद्याने व सफारी नियमित वेळेनुसार ऑनलाईन तिकीटासह खुली राहतील. परंतु भेटी देणाऱ्यांनी पूर्णपणे लसीकरण अनिवार्य असेल. ब्युटी पार्लर, केश कर्तनालयासाठी लागू केलेल्या समान निर्बंधांच्या अधिन स्पा ५० टक्के क्षमतेसह कार्यरत राहू शकतात. अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या संख्येवर आता कोणतीही मर्यादा नाही.

लसीकरणात जिल्हा पात्र ठरल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले; मात्र नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जिथे शिथिलता त्यानुसार दैनंदिन व्यवहार करावे; मात्र निर्बंध असलेल्या क्षेत्रात नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या