चंद्रपूर : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या लसीकरणाकडे प्रामुख्याने लक्ष दिल्या जात आहे. मात्र लसीकरण केंद्र अपुरे असल्यामुळे अनेकांना वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनही दिले आहे.
कोरोनावर आळा घालण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. मात्र रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आता लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या आहे. त्यामुळे प्रत्येक जण लसीकरणासाठी नाव नोंदणी करीत आहे. आता १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र केंद्राची संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण केंद्र वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.