शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

त्याग आणि दानाची श्रृंखला जिल्हाभर वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:44 IST

स्वत:चे पोट भरणे प्रकृती आहे. दुसऱ्याचे ओरबडून घेणे विकृती आहे. तर स्वत:च्या सोबत इतरांची काळजी घेणे ही संस्कृती आहे.

सुधीर मुनगंटीवार : भद्रावतीत माणूसकीच्या भिंतींचे उद्घाटनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वत:चे पोट भरणे प्रकृती आहे. दुसऱ्याचे ओरबडून घेणे विकृती आहे. तर स्वत:च्या सोबत इतरांची काळजी घेणे ही संस्कृती आहे. भारताची सभ्यता त्यागाची आणि दानाची असल्याने टिकून आहे. विवेकानंद महाविद्यालयात सुरु करण्यात आलेली माणूसकीची भिंत त्यागाचे प्रतिक असून ही श्रृंखला जिल्हाभर वाढवावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तसेच विवेकानंद विद्यालयात ठेवण्यात आलेल्या वॉटर कुलरचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने माणूसकीच्या भिंतींच्या उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उदघाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, आमदार बाळू धानोरकर, बळवंत गुंडावार, जिल्हा परिषद सभापती अर्चना जीवतोडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष युवराज धानोरकर, प्राचार्य एम. उमाटे, सुनिता खंडारकर, तहसीलदार सचिन कुमावत, मुख्याधिकारी विनोद जाधव, कार्यक्रमाचे समन्वयक अविनाश सिधमशेट्टीवार आदींची उपस्थिती होती.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, आपल्याकडे जे अधिक आहे. ते या भिंतीवर आणून ठेवणे आणि ज्यांना आवश्यकता आहे, त्यांनी ते घेऊन जाणे हीच आपली संस्कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भिंतीजवळ स्वत:जवळ असणाऱ्या अधिकच्या वस्तू ठेवल्या जातील व ज्याला गरज असेल तो ते घेऊन जाईल. देणाऱ्यांना ना अभिमान, ना घेणाऱ्यांना कमीपणा, अशी ही माणूसकी आहे. आपल्या सारख्याच दिनदुबळा असणाऱ्या समाजाला आपण मदत करणे, ही नैसर्गिक प्रवृती आहे. आणि सुदैवाने आपल्या संस्कृतीमध्ये या लोकांची संख्या अधिक असून याची एक श्रृखंला तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे भद्रावतीमधील ही भिंत या शहरापूरतीच मर्यादित न राहता जिल्हाभरात ही मोहिम पुढे गेली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी केली. आ. धानोरकर यांना दिलेले वचन पूर्ण झाले असून चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुठल्याही चांगल्या कामांना कायम पाठींबा राहील. नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी नगराच्या संदर्भातील प्रस्ताव आणावे. आपण त्याला मंजूरी देवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.त्रिसुत्रीवर कामचंद्रपूर जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून समतोल विकासाची माझी निती असून हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्हा म्हणून मला पुढे न्यायचा आहे. त्यासाठीच आरोग्य, शिक्षण, रोजगार या त्रिसुत्रीवर लक्ष केंद्रित केले असून जनतेने गावागावात एकत्रित येवून विकासासाठी आग्रही राहावे, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले.