शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमधील हरभरा उत्पादकतेत ७५० किलो वरून १२०६ किलोपर्यंत वाढ; शेतकऱ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 20:29 IST

या निर्णयामुळे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

चंद्रपूर: सन २०२२-२३ मध्ये पुरेसा पाऊस पडल्याने जमिनीत असलेला ओलावा आणि चणा (हरभरा) पिकासाठी अनुकूल नैसर्गीक परिस्थिती यामुळे यंदा जिल्ह्यात चणा पिकाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. असे असले तरी, शासनाने मागील पाच वर्षांपूर्वी ठरवून दिलेल्या प्रति हेक्टरी ७५० किलो अशा अल्प स्वरूपाच्या उत्पादकतेमुळे सरकारी चणा खरेदी केंद्रांवर अल्प उत्पादकतेत चणा विकल्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरीत चणा खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत होता, त्यामुळे चणा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होते. 

या गंभीर प्रश्नासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सदरची गंभीर बाब पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देत चंद्रपूर जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने योग्य उत्पादकता लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अशी आग्रही विनंती केली. 

देवराव भोंगळे यांच्या विनंतीनुसार, सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाची चालू वर्षाकरिता सुधारीत अंदाजित पुर्वानुमानानुसार चणा (हरभरा) पिकांची अंदाजित उत्पादकता ही प्रती हेक्टरी १२०६ किलो इतकी घेण्यात आली असल्याने त्यानुसारच शासनाने जिल्ह्याकरीता खरेदी परवानगी द्यावी, अशी मागणी शासनदरबारी लावून धरली आणि त्यासंदर्भाने सातत्याने पाठपुरावा केला. मुनगंटीवारांच्या यांच्या प्रयत्नामुळे शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चणा (हरभरा) उत्पादकता हेक्टरी ७५० किलो वरून १२०६ किलो करण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीचं “दिलेला शब्द, पुर्ण करतात” जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकरी बांधवांच्या मागणीला सुद्धा त्यांनी प्राथमिकता दिली. आणि मागील पाच वर्षांपासून चणा पिकासाठी ठरवून दिलेला ७५० किलो प्रति हेक्टरी उत्पादकता शासन स्तरावरून वाढवून घेत १२०६ किलो प्रती हेक्टरी अशी नवीन उत्पादकता लागू केल्याने जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांना याचा निश्चितचं फायदा होईल. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे  जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांचे हे बहुप्रलंबीत प्रश्न सुटल्याने सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार