लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदतर्फे सिकलसेल नियंत्रण कर्मचारी म्हणून काम करणाºयांना अत्यल्प मानधन व प्रवासभत्ता दिला जातो. परिणामी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागते. त्यामुळे मानधन व प्रवासभत्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जानेवारी २०११ पासून चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे नियंत्रण कार्यक्रम राबविल्या जात आहे. जिल्ह्यात १५ तालुक्यात १ जिल्हा रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय, नऊ ग्रामीण रुग्णालय आणि ५८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत जिल्हा समन्वयक, तालुका पर्यवेक्षक, सिकलसेल स्वयंसेवक, डाटा एंट्री आॅपरेटर आदी कर्मचारी सर्व्हेक्षण, औषधोपचार आणि जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे करत आहेत.मात्र शासनाकडून या कर्मचाºयांचे मानधन आणि प्रवास भत्त्याकरिता फारच तुटपुंजी रक्कम स्वयंसेवी संस्थेला मिळत आहे. आजचे महागाईच्या काळात या कर्मचाऱ्यांना आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह सद्याचे मानधन रकमेत करणे कठीण झाले आहे. तर एसटी महामंडळाच्या प्रवास भाडेवाढमुळे कर्मचाºयांना प्रवासभत्ताही पुरेसा नाही. त्यामुळे शासनाने इतर कंत्राटी कर्मचाºयांप्रमाणे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचाºयांचे मानधन आणि प्रवास भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा कृती समितीचे वतीने निवेदनातून करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे, समितीचे अध्यक्ष संजय उमरे, सचिव कृष्णा पाहुणे, वंदना हिंगे, अशोक गिरडकर, विजय घोडमारे, शकील शेख आदी उपस्थित होते.
मानधन व प्रवास भत्त्यात वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:08 IST
जिल्हा परिषदतर्फे सिकलसेल नियंत्रण कर्मचारी म्हणून काम करणाºयांना अत्यल्प मानधन व प्रवासभत्ता दिला जातो. परिणामी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागते. त्यामुळे मानधन व प्रवासभत्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मानधन व प्रवास भत्त्यात वाढ करा
ठळक मुद्देसिकलसेल नियंत्रण कर्मचाऱ्यांची मागणी : हंसराज अहीर यांना निवेदन