शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

धोबी समाजाला एससी प्रवर्गात समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:56 IST

धोबी समाज स्वातंत्रपूर्व महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या यादीत सामील होता. मात्र स्वतंत्र महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय प्रवर्गात टाकण्यात आले. त्यामुळे समाजावर मोठा अन्याय झाला.

ठळक मुद्देकृती समितीची मागणी : निवासी उपजिल्हाधिकाऱ्याला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धोबी समाज स्वातंत्रपूर्व महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या यादीत सामील होता. मात्र स्वतंत्र महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय प्रवर्गात टाकण्यात आले. त्यामुळे समाजावर मोठा अन्याय झाला. ही चूक दुरूस्ती करून धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी परिट सेवा मंडळ व धोबी समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सचिन कलंत्री यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.धोबी समाजाने अन्यायाविरूद्ध राज्यभर आंदोलने केली. दरम्यान, तत्कालिन आमदार व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना धोबी समाजावर कसा अन्याय झाला, यावर अभ्यासपूर्ण भाषणे केली. आता सत्तेत असूनही मागणी पूर्ण केली नाही. धोबी समाज आरक्षण कृती समितीने मागील अडीच वर्षांत ८४ वेळा मंत्रालयात विविध मंत्र्यांना भेटून समस्येकडे लक्ष वेधले. आता कॅबिनेटमध्ये दुरूस्ती करून केंद्राकडे शिफारस पाठविण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगितल्या जात आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलावे. सरकारने समाजाची दखल घेतली नाही तर मुंबई येथे ८ जानेवारी २०१९ ला आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी परिट सेवा मंडळ व धोबी समाज आरक्षण कृती समितीचे भय्याजी रोहनकर, रोहित तुराणकर, शितल क्षीरसागर, नंदिनी चुनारकर, किशोर केळझरकर, हरिभाऊ भाजीपाले, विलास भोसकर प्रकाश वडुलाकर, सुरेंद्र क्षीरसागर विनोद बोसकर, भारत तुराणकर, विजय जाधव, संदीप चटपकर, राजु तुराणकर उपस्थित होते. 

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमाती