शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वाहतुकीत बदल झाल्याने प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:21 IST

मालगाडीचे डब्बे घसरल्याने बल्लारशाह : नागपूर मार्ग दिवसभर बंद

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : तेलंगणातील रामगुंडम स्थानकानजीक १२ नोव्हेंबरच्या रात्री मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरल्याने बल्लारपूर चेन्नई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे १३ नोव्हेंबर रोजी नागपूरकडून बल्लारपूर मार्गे चेन्नईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अन्य मार्गाने पुढे गेल्यामुळे बल्लारशाह रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली व त्यांना तिकीट रद्द करावी लागली. हा मार्ग २२ तासांनी खुला करण्यात आला. रात्री दक्षिण एक्स्प्रेस बल्लारशाह मार्गे हैदराबादकडे रवाना झाली.

बुधवारी रेल्वेने जाणारे प्रवासी आपल्या नियोजित स्थळाकडे जाण्यास जेव्हा बल्लारशाह रेल्वेस्थानकाकडे आले, तेव्हा त्यांना कळले की नागपूरकडे जाणाऱ्या व चेन्नईकडे जाणाऱ्या सर्व सुपरफास्ट गाड्या रामगुंडकडे मालगाडी घसरल्यामुळे दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. यामुळे बल्लारशाह स्थानकावर आलेले रेल्वे प्रवासी वेळेवर काय करावे, त्यांना सुचेनासे झाले. कारण बरेच प्रवासी दिवाळीच्या सुट्यात आले व परत जाण्याचा तयारीत होते तर काही प्रवासी छटपूजेसाठी आले व परतीचा प्रवास करणार होते. 

परंतु, नाईलाजाने त्यांना दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी करावी लागली. अलीकडे रुळावरून गाड्या घसरण्याचे सत्रच सुरू आहे. या आठवड्यात बल्लारशाह स्थानकावर वेगवेगळ्या दिवशी दोन गाड्यांचे डब्बे रुळावरून घसरले व लगेच लोहमार्ग सुरळीत करण्यात आला. परंतु अलीकडे रुळावरून गाडीचे चाक घसरण्याचे कारण काय याची चिंता अनेकांना पडली आहे. 

मालवाहतूकही खोळंबली बुधवार रोजी बल्लारशाह स्थानकावरून २०१०१.२०१०२ नागपूर सिकंदराबाद, ही गाडी रद्द करण्यात आली होती. याशिवाय दक्षिणेकडून बल्लारशाह मार्गे जाणाऱ्या व बल्लारशाह मार्गे चेन्नईकडे जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेस, यशवंतपूर एक्स्प्रेस, दानापूर सिकंदराबाद, एर्नाकुलम राप्तीसागर एक्स्प्रेस, आंध्र प्रदेश एक्स्प्रेस, अशा ५० च्या जवळपास सुपरफास्ट एक्स्प्रेस बल्लारशाह मार्गे न जाता दुसऱ्या मार्गान वळवण्यात आल्या. याशिवाय मालवाहतूकसुद्धा खोळंबली. बुधवारी रात्रीपर्यंत मार्ग खुला झाल्यामुळे दक्षिण एक्स्प्रेस बल्लारशाह मार्गे सोडण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेchandrapur-acचंद्रपूर