शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:31 IST

बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी दोन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली.

ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल : पीक विमा योजनेचेही संरक्षण नाही

अनेकश्वर मेश्राम ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी दोन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. कापसाचे पीक अंतिम टप्प्यात असताना बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस पिकाला विमा योजनेचे संरक्षण नाही. अशातच कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.तालुक्यात यावर्षी पर्जन्यमानाने चांगलाच दगा दिला. यामुळे भाताचे उत्पादन हातून गेले. सरासरीच्या ५० टक्केही धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या दारात आले नाही. शेतकºयांची आशा कापूस पिकावर होती. खरीप हंगामातील याच पिकांवर शेतकऱ्यांचा आर्थिक डोलारा उभा होता. परंतु कापूस पिकांवर बोंडअळीचा प्रदुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव (पोडे), विसापूर, हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली), कोठारी, दहेली, कळमना, कोर्टीमक्ता, पळसगाव, आमडी, किन्ही आदी गावात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातील शेतकऱ्यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावाने मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ निसर्गाने आणली आहे.बल्लारपूर तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असताना शासनाने पीक विमा योजनेतून वगळण्याचे कारस्थान केले. शासनाच्या पिकविमा योजनेचा लाभ नाही व बोंडअळीचा मारही सहन करायचा, या दुहेरी संकटात तालुक्यातील शेतकरी वर्ग सापडला आहे. शासकीय पातळीवर सर्वेक्षणाचा सोपस्कार केला जाणार असला तरी शेतकऱ्यांना मदत मिळेल, याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. शासनाने तालुक्यातील अडचणींत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.धान उत्पादकासोबतच कापूस उत्पादकही संकटातबल्लारपूर तालुक्यात धान व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सहा हजार ७६५ हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. यामध्ये ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. धान पिकाचे क्षेत्र २ हजार ९०९६० हेक्टर आहे. तूर पिकांचे ३७३.३० हेक्टर तर सोयाबिनचा पेरा ३३३.२० हेक्टरवर आला आहे. तालुक्यात पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत अर्धेच झाले. परिणामी धानाचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाले. कापूस पीक जोमाने आले. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकºयांवर नामुष्की ओढवली. यामुळे तालुक्यात धान उत्पादक शेतकºयांसोबत कापूस उत्पादकही संकटात सापडला आहे.बल्लारपूर तालुक्यात कापूस पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. याची सूचना कृषी विभागाला देण्यात आली. सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. सर्वेक्षण अहवाल तातडीने सादर करण्याची विनंती करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई मिळावी, म्हणून शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.- गोंविदा पोडे, सभापती, पंचायत समिती, बल्लारपूर