शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण प्रकल्पाचा फटका

By admin | Updated: May 24, 2014 23:28 IST

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील निर्माणाधीन निम्म वैनगंगा प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असला तरी प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे. परंतु भविष्यातील लाभार्थी गावातील शेतकर्‍यांना स्टॅम्प

शेतकर्‍यांना भुर्दंड : दीडपट लागत आहे स्टॅम्प ड्युटी

लखमापूर : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील निर्माणाधीन निम्म वैनगंगा प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असला तरी प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे. परंतु भविष्यातील लाभार्थी गावातील शेतकर्‍यांना स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून दीडपट रक्कम अधिक भरावी लागत आहे. प्रकल्पाचे काम अपूर्ण असताना नदीलगतच्या राजुरा, कोरपना तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कोरडवाहू जमिनीची ओलिताच्या क्षेत्रामध्ये शिरगणती होत आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्री मुल्यांकनात भरीव वाढ करण्यात आल्याने शेतकर्‍यांना अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

पैनगंगा नदीवरील निम्म पैनगंगा प्रकल्प हा मध्यम घनतेचा प्रकल्प आहे. प्रकल्पबाधित गावांनी प्रकल्पाला विरोधही दर्शविला आहे. मात्र शेतजमिनीच्या सिंचनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने हा प्रकल्प उदयास यावा, असाही सूर आहे. राजुर्‍याचे तत्कालिन आमदार अँड. वामनराव चटप यांनी हा प्रकल्प मध्यम घनतेच्या आकारमानात नसेल तर त्याचे आकारमान कमी करावे, अशी मागणी केली होती. या प्रकल्पाअंती या नदीप्रवाह क्षेत्रातील बंधारे बांधण्याचाही प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात आला आहे. पैनगंगा नदी राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची बारमाही प्रवाहित नदी आहे. या नदीला अडाण, अरुणावती, विदर्भ, वर्धा, निगरुडा आदि उपनद्या जोडल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अखंड असतो. या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी या सिंचन प्रकल्पाची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

अनेक उद्योगांनाही या नदीचा पाणी पुरवठा मोठय़ा प्रमाणात केला जातो. दिवसेंदिवस खोल जात असलेली जलपातळी, नैसर्गिक असंतुलन यामुळे पाण्याचा होणारा तुटवडा या रुपातून भरुन निघेल, हा प्रकल्पामागील उद्देश आहे.

या प्रकल्पाचा केवळ यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाच फायदा नसून शेजारच्या तेलंगणा राज्यातील बेला, जैनत, आदी मंडल परिसरातील गावांनाही या प्रकल्पाचा सिंचनासाठी लाभ होणार आहे. हा एकमेव प्रकल्प केंद्रस्तरावर दोन राज्याच्या दुहेरी हित साधणारा ठरणार आहे. कोरपना तालुक्यातील चार हजार हेक्टरमधील शेतजमिनीचे पीकक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परंतु प्रकल्पाचे काम अपूर्ण असताना पूर्णत्वास येण्याआधीच शेतकर्‍यांच्या जमिनी ओलिताखाली आल्याचे दाखविण्यात आले आहे. (वार्ताहर)